Cooking Hacks: ब्रेकफास्ट, असो किंवा जेवण आपण कधीतरी पराठा (Paratha) बनवतोच. पराठ्यांमध्ये खूप पर्याय असतात कधी मिक्स भाज्यांचा पराठा करू शकतो, मेथी, आलू, पनीर, चीझ अश्या अनेक गोष्टींपासून पराठा बनतो. सकाळी नाश्त्यामध्ये चहा आणि पराठा (morning breakfast recipes) खाण्याची मजा हि काही औरच असते.  पण बऱ्याचदा असं होत कि, आईसारखा उत्तम पराठा आपल्या हातून होत नाही किंवा हॉटेल मध्ये एवढा टेस्टी पराठा कसा बनवला जातो, तो घरी का बनत नाही  हा प्रश्न आपल्याला पडतो पण आता टेन्शन नॉट ! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पराठ्यांसाठी स्टफिंग  (how to make stuffing in paratha) बनवताना आणि पीठ मळताना काही मोजक्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेऊन जर तुम्ही कृती केलीत तर तुमचा पराठा लाजवाब झालाच म्हणून समजा...(paratha making recipes)


चविष्ठ पराठा बनवण्याची सोपी पद्धत आणि खास टिप्स (paratha making tips)
चपाती असो व पराठा किंवा पुरी पण ते बनवताना सर्वात महत्वाचं असत पीठ मळण्याची पद्धत...आता पद्धत म्हणजे काय तर असं पीठ मळायला हवं ज्याने पराठा मऊ लुसलुशीत आणि खुप वेळ टिकेल वातट होणार असा बनेल . 


पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यात 1-2 चमचे तेल घाला..पीठ  मळताना त्यात मीठ घाला आणि आवडत असेल तर ओवा घालायला विसरू नका...याने पराठा खूप टेस्टी बनेल.   


पराठा क्रिस्पी कसा बनवाल (crispy paratha)


पराठा क्रिसपी (Crispy Parantha) बनवण्यासाठी त्यात तूप आणि कोमट पाणी घाला आणि मग ते मळा. पीठ मळून झाल्यावर त्नेत्याला हलक्या हाताने तेल लावा आणि मलमल च्या रुमलखाली १५-२० मिनिट झाकून ठेवा...मग पराठा लाटायला घ्या. 


स्टफिंग भरताना हे नेहमी लक्षात ठेवा (stuffed paratha)


भाजीच स्टफिंग भरून पराठा बनवणार असाल तर एक नेहमी लक्षात ठेवा भैमधील सगळं अतिरिक्त पाणी आधी काढून घ्या. किसलेला कांडा किंवा भाज्या पाणी सोडतात त्यामुळे स्टफिंग ओलसर होऊन पराठा लाटताना फाटेल किंवा पचपचीत लागेल... 


पराठा भाजताना लक्षात ठेवायच्या गोष्टी 


पराठा  भाजताना तो नेहमी गॅस बारीक करून भाजावा म्हणजे तो व्यवस्थित  भाजला जाईल आतील भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील. आणि पराठा सुद्धा खूप वेळ टिकून राहील.  (kitchen tips how to make soft stuffing paratha and dough kneading tips in marathi)