मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लोकं घरी आहेत, त्यामुळे ऑफिसमधील काम असो, किंवा शाळा कॉलेजचे लेक्चर आणि अभ्यास लोकांचे सगळे सध्या घरातून सूरू आहे. ज्यामुळे लोकांचा मोबाइल फोन आणि लॅपटॉपचा वापर खूप वाढला आहे. एकीकडे नोकरी करणारे लोक घरात काम करत असल्याने अधिक स्क्रीन वेळ घालवत आहेत, तर विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसमुळे गॅझेटवर जास्त वेळ घालवत आहेत. क्लास झाल्यानंतर देखील हे तरुण आपलं फोन बर्‍याच काळासाठी वापरतात. ज्यामुळे स्क्रीनसमोर बराच काळ बसल्यामुळे आपल्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होत आहे आणि या कारणास्तव लोकांच्या सध्या डोळ्यांच्या तक्रारी समोर येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला ही अशा तक्रारी येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या डोळ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. डोळ्यांच्या समस्येकडे जर, तुम्ही दुर्लक्ष केले तर तुमच्यासाठी हे त्रास ठरु शकते. तसेच तुम्ही बर्‍याच काळासाठी फोन किंवा लॅपटॉप चालवत असल्यास, नेत्रतज्ज्ञांनी सल्ला घेतला पाहिजे. त्याच बरोबर 20-20-20 रुल ची काळजी घेतली पाहिजे.


आता तुम्ही म्हणाल की, हा 20-20-20 रुल काय आहे आणि तो कसा पाळला जातो? तर याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


डोळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानूसार स्क्रीनमुळे डोळ्यांवर खूप परिणाम होतो. डॉक्टर म्हणाले, "जे लोकं स्क्रीनसमोर 2 तास घालवतात त्यांच्या डोळ्यांवर ताण पडण्याचा धोका आहे, पण भारतात ही वेळ सरासरी 7 तास झाली आहे. अशा परिस्थितीत डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही पावले उचलली गेली पाहिजेत."


20-20-20 नियम काय आहे?


तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जेव्हा बर्‍याच काळासाठी स्क्रिनवर काम करता, तेव्हा मधेमध्ये ब्रेक घेत रहा. या व्यतिरिक्त, 20-20-20 रुल पाळा. या नियमात, जेव्हा जेव्हा आपण 20 मिनिटांसाठी सतत स्क्रीन पाहतो तेव्हा आपण 20 मिनिटांनंतर डोळ्याला ब्रेक दिला पाहिजे. यासाठी, 20 मिनिटे स्क्रीनवर पाहिल्यानंतर, 20 फूट अंतरावर पाहा आणि 20 सेकंदांचा ब्रेक घ्या. यानंतर आपण पुन्हा स्क्रीनकडे पाहा. याशिवाय पुन्हा पुन्हा डोळे मिचकवत रहा, यामुळे तुमचे डोळे कोरडे रहाणार नाही आणि याचा तुमच्या डोळ्यांना खूप फायदा होईल.


मुलांची विशेष काळजी घ्या


वास्तविक, जेव्हा मुले स्क्रिनकडे पाहतात तेव्हा त्यांचे डोळे कमी वेळा मिचकवतात. अशा परिस्थितीत त्यांची विशेष काळजी घ्या आणि त्याफोनपासून मुलांना थोडी विश्रांती द्या आणि स्क्रीनवरील वापरण्याची वेळ कमी करण्यास सांगा.