CDS General Bipin Rawat Helicopter Crash:  तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये खराब हवामानामुळे CDS जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांचंही निधन झालं आहे. या अपघातात चौकापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुलिका रावत यांचं शिक्षण
मधुलिका रावत यांनी दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं. 2016 मध्ये जनरल बिपीन रावत लष्करप्रमुख झाले, तेव्हा मधुलिका यांना आर्मी वुमन वेल्फेअर असोसिएशन (AWWA) चं अध्यक्षपद स्वीकारण्याची संधी मिळाली. त्या काळात त्यांनी कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासह अनेक सामाजिक कार्य केली. जनरल बिपिन रावत यांना दोन मुली आहेत. एका मुलीचे नाव कृतिका रावत आणि दुसरीचे तारिणी रावत आहे.



मधुलिका यांचं शहडोलमध्ये माहेर
CDS बिपिन रावत यांची पत्नी मधुलिका रावत यांचं माहेर मध्य प्रदेशातील शहडोलच्या सोहागपूर इथं आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मधुलिका रावत शेवटच्या 2012 मध्ये सोहागपूर गढीला एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या.


कुटुंबियांना धक्का
CDS बिपीन रावत यांच्या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. मधुलिका रावत यांचे चुलत भाऊ विश्ववर्धन सिंह यांनी सगळं अचानक संपेल असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.


सामाजिक कार्यात अग्रेसर
मधुलिका रावत अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. सैनिकांच्या पत्नींना सशक्त बनवणं, त्यांना शिलाई, विणकाम, तसंच ब्युटीशिअनचे कोर्सेस घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचं काम त्या करत होत्या. बुधवारी त्या पती सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासोबत कुन्नूरच्या वेलिंग्टन इथल्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी जात होत्या. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. जनरल बिपिन रावत यांची 31 डिसेंबर 2019 रोजी देशातील पहिले CDS म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.