भूपेश बघेल : 32 व्या वर्षी आमदार, 37 व्या वर्षी मंत्री आणि 20 वर्षांनी बनले मुख्यमंत्री
वयाच्या 57 व्या वर्षी राज्याच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी पोहेचले आहेत.
छत्तीसगड : भूपेश बघेल हे आज छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेत राज्याचा कार्यभाग स्वीकारतील. एक झुंजारू व्यक्तिमत्व, चपळ आणि संघर्षासाठी ते ओळखले जातात. पाच वर्षांपूर्वी झीरम घाटी हत्याकांडमध्ये तत्कालीन प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी त्यांना संघटनेचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. ऑक्टोबर 2013 मध्ये पक्षाची कमान संभाळल्यानंतर त्यांनी पक्ष मजबूतीसाठी मोठा संघर्ष केला. याचा परिणाम या निवडणूकीत दिसून आला. भाजपाला चारी मुंड्या चीत केल्यानंतर पक्षाने भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री बनवले.
यात्रेने बनवले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी बघेल यांना गेल्या पाच वर्षात पाऊणे तीन लाख किलोमीटर यात्रा केली. संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी गावागावांत जाऊन रात्रभर राहिले. यामुळे त्यांना यात्रेतून बनलेला नेता असे म्हटले जाते.
लग्नामध्ये होणाऱ्या खर्चाच्या विरोधात असलेल्या बघेल यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. कमी खर्चात होणाऱ्या लग्नाला प्रोत्साहन मिळावे हा यामगचा उद्देश होता. अशा अनेक कारणांमुळे ते राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविणे असो वा जनहिताच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देणे असो बघेल नेहमीच पुढे राहिले.
20 वर्षांनी मुख्यमंत्री
23 ऑगस्ट 1961 ला शेतकरी परिवारात जन्मलेल्या भूपेश बघेल यांचा साडे चार दशकांचा मोठा राजकीय प्रवास आहे. 32 व्या वर्षी ते पहिल्यांदा पाटण मधून आमदार बनले. त्यानंतर 1998 मध्ये दिग्विजय सरकारमध्ये अविभाजीत मध्य प्रदेशचे मंत्री बनले तेव्हा त्यांच वय 37 वर्ष होते. आता वयाच्या 57 व्या वर्षी राज्याच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी पोहेचले आहेत.
दीड वर्षांपूर्वी रमण सरकारच्या मंत्र्यांसंबधीत जोडल्या गेलेल्या एका सीडी प्रकरणात त्यांना तुरूंगात जावे लागले होते.