गाडीची टाकी भरण्यापूर्वी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या !
जाणून घ्या आजचे दर
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये (Petrol Diesel Price today) आज 9 मे 2021 रोजी एक प्रकारचा दिलासा मिळाल्याची बातमी आहे. कारण आज सलग दुसऱ्या दिवशी तेल विपणन कंपन्यांनी किंमत वाढवल्या नाहीत. (Petrol Diesel Price Today). 8 मेपूर्वी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग चार दिवस वाढ केली होती. 4 मे ते आजपर्यंत किंमती (Petrol and Diesel Price 9 May 2021) मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यावेळी पेट्रोल प्रतिलिटर 72 पैसे महागले, तर डिझेल 82 पैसे प्रतिलिटर महाग झाले. शुक्रवारी पेट्रोलच्या (Petrol Diesel Price Today)आज 28 पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या किंमती 31 पैशांनी वाढल्या आहेत.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, आज राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price today in Delhi) आज 91.27 रुपये आणि डिझेलची किंमत 81.73 रुपये झाली आहे.
त्याचप्रमाणे मुंबईतील पेट्रोल (Petrol price in Mumbai)97.61 रुपये आणि डिझेल 88.82 रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल 91.41 रुपये आणि डिझेल 84.57 रुपये आहे.
चेन्नईत (Petrol Diesel Price Today)पेट्रोलची किंमत 93.15 रुपये आणि डिझेल 86..65 रुपये विकले जात आहेत.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत ? यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.