नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये आज सलग नवव्या दिवशी कोणता बदल दिसला नाही. याआधी पेट्रोल डिझेलचे दर सलग सहा दिवस वाढले होते. तेल मार्केटींग कंपन्यांनी तेलाच्या किंमतीत आज कोणता बदल केला नाहीय. याआधी पेट्रोल डिझेलच्या किंमती सलग ४८ दिवस बदलल्या नव्हत्या. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून किंमती वाढण्यास सुरुवात झाली. मार्चनंतर पहील्यांदा सप्टेंबरमध्ये डिझेलच्या किंमतीत कपात दिसली. तेल मार्केटींग कंपन्यांनी ८२ दिवस किंमती बदलल्या नव्हत्या. वाढलेल्या एक्साईज ड्युटीला तेलाच्या उतरत्या दराशी ताळमेळ साधायचाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान २० नोव्हेंबरपासून आतापर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर १७ वेळा वाढवले. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती या १७ दिवसांमध्ये २.६५ रुपये प्रति लीटरने वाढल्या. डिझेलचे दर ३.४० रुपये प्रति लीटरने वाढले. पेट्रोल डिझेलचे दर याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये वाढले होते. 


आज नवव्या दिवशी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ८३. ७१ रुपये प्रति लीटर आहे. मुंबईमध्ये ९०.३४ रुपये लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ८५.१९ रुपये आणि चेन्नईमध्ये ८६.५१ रुपये प्रति लीटर आहे.