नवी दिल्ली : आज सोन्याची किंमत प्रति तोळे 47,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) मध्ये सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांची वाढ दिसून आली.  तज्ज्ञांच्या मते, मे महिन्यात सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. देशातील आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने, या महिन्यातील सोन्याच्या दराबाबतचा अंदाज जाहीर केलाय. या महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या किंमतीत वाढ होईल, असे यात म्हटले आहे. चांदीच्या किंमतीत वाढ होण्याचा कलही आपल्याला पाहयला मिळू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ कायम राहील असे मोतीलाल ओसवाल आर्थिक संचालक शोर नार्णे म्हणाले. अमेरिकन ट्रेझरी यिलमध्ये घट झाली आहे. भारत आणि जपानमधील कोरोनाच्या वाढत्या केसेसवरही मार्केट लक्ष ठेवून आहे. तसेच अमेरिकेतील बिडेन सरकारकडून आणखी एक मदत पॅकेज मिळणे अपेक्षित आहे.



या कारणांमुळे बाजारात नकारात्मक येऊ शकते. भारत आणि चीनमध्ये लॉकडाऊन किंवा कर्फ्यूनंतर जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा सोन्याची मागणी वाढेल. ज्यामुळे सोन्याच्या किंमतीला वेग येईल.


चांदीच्या किंमतींबद्दल तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. महिन्याच्या अखेरीस सोन्याचा दर साधारण 70,000 असू शकतो. आपण पुढील चार ते सहा महिन्यात सोन्याची किंमत 52,000 ते 54,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते असे नार्ण म्हणाले.