नवी दिल्ली : भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० मध्ये साजरा करण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रूपाने भारताला पहिले राष्ट्रपती लाभले. हा प्रजासत्ताक दिन साजरा करत पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इरविन मैदानात भारतीय ध्वज फडकवला होता. 


...त्यानंतर सहा मिनिटांनी देशाला मिळाले पहिले राष्ट्रपती


मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी १९५० ला सकाळी १०.१८ मिनिटांनी भारताचं संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर काही मिनिटांनी १०.२४ वाजता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. 


१९५० पासूनच पाहुणे बोलवण्याची प्रथा


१९५० पासूनच प्रजासत्ताक दिनाला इतर देशातील पाहुणे बोलवण्यास सुरूवात झाली होती. पहिल्या प्रजसत्ताक दिवसावर इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आता ६८ वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमंत्रित करण्यात आलेल्या १० पाहुण्यांमध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती असतील. 


वेगवेगळ्या जागेवर साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन


१९५० आणि १९५४ दरम्यान भारतात प्रजासत्ताक दोन समारोह साजरा करण्यासाठी एक निश्चित स्थळ नव्हतं. सुरूवातीला हा समारोह लाल किल्ला, नॅशनल स्टेडियम, किंग्सवे कॅम्प आणि नंतर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला होता. १९५५ मध्ये पहिल्यांदा राजपथाची प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी निश्चिती करण्यात आली.
 
या दिवशी सेनेद्वारे परेड केली गेली होती आणि तोफांची सलामी देण्यात आली होती. परेडमध्ये सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांनी सहभाग घेतला होता. आजही प्रजासत्ताक दिन राजपथावरच साजरा केला जातो.