मुंबई : जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये टाटा - अंबानी - बिर्ला सारख्या लोकांना गणल जातं. या लोकांना संपूर्ण देश ओळखतो. मात्र त्यांच्या शिक्षणाबद्दल कुणालाच काहीच माहित नाही. भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी एमबीएच्या शिक्षणाकरता परदेशात गेलेले, मात्र शिक्षण अर्धवट ठेवूनच भारतात परतले. साधारण डिग्री घेऊन या लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आता ते टॉपचे बिझनेसमन आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


1) टाटा ग्रूपचे माजी चेअरमन रतन टाटा 


रतन टाटा यांनी आर्किटेक्चर अॅण्ड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. त्यांनी ही डिग्री 1962 मध्ये अमेरिकेच्या कॉरनेल यूनिर्व्हसिटीमधून घेतली आहे. त्यानंतर 1975 मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अॅडवान्स मॅनेजमेंटची डिग्री घेतली. 



2) रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 


आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी मुंबई युनिर्व्हसिटीच्या डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) मधून केमिकल इंजीनिअरिंगमधून पदवी घेतली आहे. इथून पदवी घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी एमबीएच शिक्षण घेण्यासाठी स्टॅनफोर्ड यूनिर्व्हसिटीमध्ये गेले. मात्र ते आपलं शिक्षण पूर्ण करू शकले नाही. एका वर्षाने त्यांनी भारतात परत येऊन वडिल धीरूभाई अंबानी यांचा व्यवसाय सांभाळायला सुरूवात केली. 



3) एचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख 


दीपक पारेख यावेळी एचडीएफसी बँकेचे चेअरमन आहेत. दीपक पारेख एक चार्टर्ड अकाऊंटट आहेत. ज्यांनी आपलं करिअर न्यूयॉर्क अनर्स्ट अॅण्ड यंग मॅनेजमेंट कंसल्टंसी सर्विसेससोबत कामाला सुरूवात केली. यानंतर ते भारतात परतले आणि ग्रिंडलेज बँक आणि चेज मॅनहट्टन बँकेसोबत काम सुरू केलं. 1978 मध्ये त्यांनी एचडीएफसीमध्ये प्रवेश केला 



4) आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला 


कुमार मंगलम यांनी युनिर्व्हसिटी ऑफ बॉम्बेमधून बी कॉम केलं आहे. आणि चार्टर्ड अकाऊंट बनले. त्यानंतर त्यांनी बिझनेस स्कूल ऑफ लंडनमधून एमबीएची पदवी घेऊन आले. 



5) महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिन्द्रा 


महिन्द्रा अॅण्ड महिन्द्राचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आनंद महिन्द्रा आहेत. त्यांनी हार्वर्ड कॉलेज, कॅम्ब्रिजमधून पदवी घेतली आहे. तिथूनच त्यांनी मेकिंगचा कोर्स पूर्ण केला. त्यांनतर हार्वर्ज बिझनेस स्कूल, बोस्टनमधून 1981 मध्ये एमबीएचं शिक्षण घेतलं. 



6) भारती एन्टरप्रायजेसचे चेअरमन सुनील भारती मित्तल 


टेलीकॉम टायकून या नावाने सुनील भारती मित्तल ओळखले जातात. हे भारती एंटरप्रायजेसचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ आहेत. त्यांनी पंजाब यूनिर्व्हसिटीमधून 1976 मध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सची डिग्री घेतली. त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षीच कामाला सुरूवात केली. तसेच ते हार्वर्ड बिझनेस स्कूल, यूएसएचे विद्यार्थी आहेत. 



7) इन्फोसिसचे माजी चेअरमन एनआर नारायण मूर्ती 


इन्फोसिसचे माजी चेअरमन नारायण मूर्ती यांनी 1967 मध्ये यूनिर्व्हसिटी ऑफ मैसूरमधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमधून 1969 मध्ये मास्टर डिग्री घेतली. 



8) विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी 


विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजीने स्टॅनफोर्ड यूनिर्व्हसिटी, यूएसएमधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये डिग्री घेतली. त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला गेले. मात्र 21 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनतर त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतले. 



9) एचसीएलचे फाऊंडर आणि चेअरमन शिव नादर 


शिव नादर एचसीएलचे फाऊंडर आणि चेअरमन आहेत. त्यांनी द अमेरिकन कॉलेज, मदुरै मधून प्री युनिर्व्हसिटी डिग्री घेतली. त्यानंतर पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. 



10) बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज 


बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाजने 1988 मध्ये युनिर्व्हसिटी ऑफ पुणेमधून मेकॅनिकल इंजीनिअरिंगची डिग्री घेतली. 1990 मध्ये त्यांनी यूनिर्व्हसिटी ऑफ वॉर्विकमधून मॅन्यूफॅक्चरिंग सिस्टम इंजिनिअरिंगमधून डिग्री घेतली.