नवी दिल्ली : आपल्याला नवं सिम कार्ड घेण्यापासून बँक अकाऊंट सुरु करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.


ही आहे शेवटची तारीख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यासोबतच इतरही वित्तीय सेवांसाठी सरकारतर्फे आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. सर्वच ठिकाणी आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च देण्यात आली आहे.


आधार कार्ड लिंक करणं गरजेचं


आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. सध्याच्या स्थितीत १३९ अशा सेवा आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. 


तुमचं आधार कार्ड कुठं वापरण्यात आलं आहे हे तुम्हाला अवघ्या काही सेकंदांत घर बसल्या कळू शकतं. पाहूयात काय आहे ही खास ट्रिक...


जर तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर केला जात आहे तर तुम्ही UIDAI कडे तक्रारही दाखल करु शकतं. या सुविधेचा ऑनलाईन वापर करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे.


अशा प्रकारे मिळवा संपूर्ण माहिती


  • https://resident.uidai.gov.in/notification-aadhaar या वेबसाईटवर लॉगिन करा किंवा https://uidai.gov.in/ वर जावून ऑनलाईन आधार सर्व्हिसेजमधील सर्वात शेवटचा पर्याय Aadhaar Authentication History वर क्लिक करा.


  • तुमच्यासमोर एक नवा रिक्वेस्ट बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये तुमचा १२ अंकी आधार क्रमांक इंटर करा आणि दुसऱ्या बॉक्समध्ये सिक्युरिटी कोड टाका.


  • यानंतर 'Generate OTP' वर क्लिक करा. OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल जो ३० मिनिटांपर्यंत वैध राहील.


  • यानंतर तुमच्या समोर पुन्हा एक नवं पेज ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला कधीपासून कधी पर्यंतची माहिती हवी आहे आणि इतरही पर्याय उपलब्ध असतील.


  • तुम्ही केवळ ६ महिन्यांचाच डेटा पाहू शकाल. जर तुमच्या आधार हिस्ट्रीमध्ये काहीतरी गडबड असल्याचं दिसून आल्यास तात्काळ १९४५ या क्रमांकावर कॉल करुन तक्रार दाखल करु शकता.