मुंबई : एटीएममधून पैसे काढताना बऱ्याचदा कॅश न येताही अकाऊंटमधून पैसे डिडक्ट होतात. त्यानंतर आपण बैचेन अवस्थेत एटीएम पुन्हापुन्हा टाकण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी काय करायच आपल्याला सुचत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयने यासाठी नियम बनवले आहेत पण याची माहिती आपल्यापैकी फार कमी जणांना असते. 


त्वरीत बॅंकेशी संपर्क करा 


खातेधारकाने आपल्या बॅंकेचे एटीएम किंवा अन्य कोणत्याही एटीएममधून पैसे काढताना कॅश आलीच नसेल आणि पैसे कट झाले असतील तर कोणत्याही बॅंकेच्या जवळच्या शाखेत जाऊन संपर्क करायला हवा.


तुमची तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि एक आठवड्यची मुदत तुम्हाला दिली जाईल. 


ट्रांसाक्शन स्लिप घ्या 


ट्रांसाक्शन फेल झाले असले तरीही त्याची स्लिप तुम्हाला सोबत ठेवावी लागेल. त्यामूळे एटीएममधून रिसिप्ट घ्यायला कधी विसरु नका. 


ट्रान्झाक्शन स्लिपमध्ये एटीएमचा आयडी, लोकेशन, वेळ आणि बॅंकेकडून मिळालेला रिस्पॉन्ड कोड प्रिंट झालेला असतो.


बॅंक देईल रोज १०० रुपये


तक्रार केल्यानतर एका आठवड्यात तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर रोज १०० रुपयाचा दंड बॅंक ग्राहकाला देते.


नियमानुसार बॅंकने एक आठवड्यात ग्राहकाला त्याची रक्कम मिळवून द्यावी.


२४ तासाचा अवधी 


ग्राहकाने आपल्या बॅंकेतून पैसे काढण्यास गेला आणि एटीएममधून कोणत्या कारणात्सव रक्कम न निघाल्यास २४ तास अवधी द्यावा लागतो.


बॅंकेकडून झालेल्या चुकीचे २४ तासात निराकरण होते आणि पैसे क्रेडिट केले जातात. 


पैसे देत नाही


दूसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढताना कधीकधी पैसे निघत नाहीत पण लॉग बुकमध्ये रक्कम गेलेली दाखवते. जर असे झाले तर तुमचे नुकसान होऊ शकते.


कारण दुसरी बॅंक पैसे देण्यास नकार देऊ शकते. 


बॅंक करते पडताळणी


ट्रांझाक्शन फेल झाल्याने तुमची तक्रार आल्यानंतर एटीएममध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज पाहिले जातात.


तुमच्यासमोरच हे फुटेज दाखविले जातात. पैसे निघालेच नसल्याचे फुटेजमध्ये दिसल्यास बॅंकेला फाईन सोबत डेबिट झालेली रक्कम द्यावी लागते.