नवी दिल्ली : दक्षिण भारतात स्वत:ला संत म्हणवून घेणाऱ्या स्वामी नित्यानंदचा २०१० साली एक अश्लील व्हिडिओ समोर आला होता. एका महिलेसोबत बाबाच्या रासलीला रंगलेल्या पाहून अनेकांना धक्का बसला होता... त्यानंतर या व्हिडिओत असलेली महिला कोण? याबद्दल अनेक चर्चाही झडल्या होत्या.


तमिळ अभिनेत्री रंजीता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१० मध्ये दक्षिण भारतातल्या एका न्यूज चॅनलनं काही फोटो समोर आणले होते. यात, बाबासोबत दिसणारी महिला तमिळ अभिनेत्री रंजीता असल्याचं पुढे आलं होतं. अडचणी वाढल्याचं लक्षात आल्यानंतर बाबा आणि अभिनेत्री दोघांनीही व्हिडिओत छेडछाड केल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून दोघं कोर्टातही पोहचले.


फॉरेन्सिक लॅबचा निर्वाळा


परंतु, बंगळुरू स्थित फॉरेन्सिक सायन्सेस लॅबोरेटरीनं या व्हिडिओसोबत कोणतीही छेडछाड केला गेला नसल्याचा निर्वाळा दिला आणि दोघांचं भांडं फुटलं.


परंतु, बाबानं चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. नुकतंच लॅबनं या प्रकरणात आणखी एक खुलासा केलाय. या व्हिडिओत दिसणारी महिला म्हणजे अभिनेत्री रंजीता असल्याचं म्हटलंय.


अवॉर्ड विनिंग अभिनेत्री


श्री वल्ली ऊर्फ रंजीता ही एक तमिळ अभिनेत्री आहे... तिला सिनेसृष्टीत आणणाऱ्या सिनेदिग्दर्शक पी. भारतीराजा यांनी तिचं नाव रंजीता असं ठेवलं. १९९२ साली 'नदोदी थेंद्रल' मधून रंजीताच्या फिल्मी करिअरला प्रारंभ झाला. तमिळशिवाय ती तेलुगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांतही दिसली. रंजीताला १९९६ साली 'माविचिगुरू' या सिनेमासाठी बेस्ट सपोर्टींग अभिनेत्रीचा 'नंदी अवॉर्ड'ही मिळालाय.


रंजीता पती राकेशसोबत

 


वैवाहिक आयुष्य


२००० साली रंजीताचा विवाह सेनेतील मेजर राकेश मेनन यांच्याशी झाला होता. लग्नानंतर रंजीतानं सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. रंजीता आणि राकेश एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. २००७ साली दोघांचे मार्ग वेगळे झाले.


संन्यास घेतल्याचं केलं जाहीर


त्यानंतर नित्यानंदचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रंजीता पुन्हा प्रकाशझोतात आली. व्हिडिओत दिसणारी महिला आपण नसल्याचं रंजीताचं म्हणणं होतं. २०१३ साली ती बंगळुरूला गेली... इथं तिनं आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.