मुंबई : जन्माला आलेलं बाळ पहिलं आपल्या आई - वडिलांनाच ओळखू लागतं. त्यानंतर त्याची कुटुंबातील इतर व्यक्तींशी ओळख होते. पण जर तुम्हाला सांगितलं की , एक असं गाव आहे जिथे लहान मुलांना आपल्या वडिलांची ओळखच नाही. त्यांना आपले वडिल कोण? हेच माहित नाही. खरंच धक्कादायक बाब या गावाचीसमोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात मनकी गावाला 'मिसिंग फादर्स' म्हणजे गायव वडिल देखील म्हटलं जातं. 513 लोकांची जनसंख्या असलेलं हे गावं तरी देखील अशी वेळ या गावातील मुलांवर येते. याच कारण ऐकाल तर तुम्हालाच धक्का बसेल. गावाची परिस्थिती अशी आहे की गावातील मुलं आपल्या वडिलांपासून दूर राहण्यास भाग आहेत. 


या कारणामुळे मुलं वडिलांना ओळखत नाहीत?


दुष्काळामुळे या गावांतील 70 टक्के पुरूषांना गावापासून दूर राहावे लागते. या गावांतील पुरूष दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि हिमाचलमध्ये नोकरीच्या शोधात जातात. या गावांत गेल्या कित्येक वर्षांपासून हवा तसा पाऊस पडलाच नाही. पाऊस न पडल्यामुळे हे गाव दुष्काळग्रस्त झालं आहे. पाण्याची कमतरता असल्यामुळे शेती करणं कठीण झालं आहे. 


एवढंच काय तर आता महिला देखील हे गावं सोडून बाहेर पडतं आहेत. महिला त्यांना जेथे योग्य वाटेल तिथे काम करणं पसंद करतात. घरातलं रहाटगाड चालू रहावं म्हणून त्या गर्भावस्थेत देखील काम करतात. 7 ते 8 महिन्याच्या असेपर्यंत काम केल्यावर प्रसुतीच्यावेळी या महिला गावी परतात. आणि मुलं थोडी मोठी झाली की कुटुंबातील इतर लोकांकडे सोपवून पुन्हा कामाला बाहेर जातात.