मुंबई : नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. पीएफ मधील पैसे निवृत्तीपर्यंत न काढण्याचा अनेकांचा मानस असतो. मात्र पीएफ मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेणे कठीण होते. परंतु, हे काम आता सोपे झाले आहे. पीएफ मध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खास करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल. 


या नंबरवर मिस कॉल देऊन जाणून घ्या पीएफ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफ अकाऊंटशी जोडल्या गेलेल्या (रजिस्टर असलेल्या) मोबाईल नंबर वरून ०११-२२९०१४०६ या नंबरवर मिस कॉल द्या. मिस कॉल दिल्यानंतर काही वेळातच तुमच्या मोबाईलवर बॅलन्स सांगणारा एक मेसेज येईल. याव्यतिरिक्त ईपीएफओ एसएमएस सेवेच्या माध्यमातून देखील तुम्हाला पीएफ अकाउंटमध्ये असलेल्या रकमेविषयी माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला ०७७३८२९९८९९ या नंबरवर एसएमएस करावा लागेल. परंतु, ज्यांनी यूएएन अॅक्टिव्हेट केलंय त्यांनाच ही सुविधा उपलब्ध होईल. एसएमएस पाठवताना मेसेज बॉक्स मध्ये EPFOHO UAN टाईप करा. त्यानंतर ज्या भाषेत माहिती हवी असेल त्या भाषेची पहिली तीन अक्षरे लिहा. उदारणार्थ- EPFOHO UAN ENG असे लिहून ०७७३८२९९८९९ या नंबरवर पाठवा. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती मिळेल. अपंगत्व, आजारावरील उपचारांसाठी पीएफ अकाउंट मधून तुम्ही पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला आरोग्याचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. 


इपीएफ बॅलेन्स आणि पासबुक ऑनलाइन असं तपासा 


1. इपीएफओने आपल्या अधिकारिक वेबसाइटने पीएफ चेक करण्याची सुविधा दिली आहे. ई पासबुक लिंक करण्याची सुविधा वेबसाइटच्या वरच्या बाजूला दिली आहे. 


2. यानंतर यूएएन नंबर आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला टाकावू लागले. 


3. वेबसाइटवर यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्या व्यू पासबुक बटनवर क्लिक करा आणि बॅलेन्स तपासा. 


अॅपद्वारे चेक बरा बॅलेन्स 


यासोबकच पीएफ बॅलेन्स आता इपीएफओ अॅपद्वारे देखील जाणून घेऊ शकता. यासाठी सर्वात अगोदर मेंबरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर यूएएन नंबर आणि पासवर्ज टाका. पुढच्या स्लाईडवर मिस कॉलवरून तुम्हाला पीएफची माहिती मिळेल. 


मिस कॉलला मिळतेय सर्वाधिक पसंती 


मिस कॉलद्वारे पीएफ जाणून घेणं ही सर्वाधिक उत्तम आणि सोपा पर्याय आहे. ईपीएफ बॅलेन्स जाणून घेण्यासाठी मोबाइल अॅप किंवा एसएमएस सर्व्हिसद्वारे सर्वात उत्तम पर्याय आहे. यासाठी कोणत्याही स्मार्टफोनची गरज नाही. तसेच नेट नसल्यासही तुम्ही बॅलेन्स जाणून घेऊ शकता.