Indian Railway Train Cost: भारतीय रेल्वेचं जगात चौथं स्थान असून देशभरात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे (Indian Railway) पाहिलं जातं. त्यामुळे रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आपल्या आर्थिक स्थितीनुसार प्रवासी ट्रेनचं तिकीट बूक (Train Ticket Book) करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जनरल (General Coach), स्लीपर (S) आणि एसी कोच असतात. काही ट्रेनमध्ये हाय क्लास कोचचाही (Train Coach) समावेश असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? एक ट्रेनचा कोच तयार करण्यासाठी किती खर्च येतो. चला तर जाणून घेऊयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक ट्रेन तयार करण्यासाठी किती खर्च येतो?


ट्रेनमध्ये वीज, पाणी, वॉशरुम, फॅन, एसी यासारख्या सुविधा असतात. त्याचबरोबर इंजिन आणि कोच देखील असतो. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेचं इंजिन तयार करण्यासाठी 15 ते 20 कोटी रुपये खर्च येतो. या ट्रेन भारतात तयार केल्या जातात असल्याने यामुळे खर्च जास्त येत नाही. भारतात दोन पद्धतींचं इंजिन तयार केलं जातं. यात इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनचा समावेश आहे. भारतात जवळपास 52 टक्के ट्रेन डिझेलवर धावतात. 


सीलिंग फॅनला आपल्याकडे 3, तर परदेशात 4 पाती का असतात? जाणून घ्या यामागचं कारण


एका इंजिनची किंमत 20 कोटी रुपये


ड्युअल मोड असलेल्या लोकोमोटिव्ह ट्रेनची किंमत जवळपास 18 कोटी रुपये असते. तर 4500 एचपी डिझेल लोकोमोटिवची किंमत जवळपास 13 कोटी रुपये असते. एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एकूण 24 कोच असतात. प्रत्येक कोच तयार करण्यासाठी 2 कोटी खर्च होतो. त्यामुळे कोचची एकूण किंमत 50 कोटी आणि 20 कोटी रुपयांचं इंजिन. त्यामुळे एक्स्प्रेस ट्रेन तयार करण्यासाठी 70 कोटींच्या घरात खर्च होतो. तसेच कोचची किंमत सुविधांनुसार वेगवेगळी असते. जनरल आणि स्लीपर कोचच्या तुलनेत एसी कोच महाग असतात. त्याचबरोबर सामान्य पॅसेंजर ट्रेन तयार करण्यासाठी 50 ते 60 कोटी रुपयांचा खर्च येतो. कारण एक्स्प्रेस ट्रेनच्या तुलनेत कमी सुविधा असतात.