मुंबई : सध्याचा जमाना हा डिजीटलचा आहे, त्यामुळे सध्या लोकं फोन, टॅब किंवा कंप्युटर / लॅपलॉपवरती बातम्या आणि माहिती मिळवतात. परंतु तरी देखील अशी अनेक लोकं आहेत जे बातम्यांचं ट्रेडिश्नल माध्यम म्हणजे वर्तमानपत्र वापरतात. काही लोकांचा वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवस देखील जात नाही. या वर्तमानपत्रात तुम्ही एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल, ती म्हणजे त्याच्या तळाशी असलेले चार रंगीत ठिपके. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की असं का केलं जातं? हे दररोज का छापले जाते आणि विशेष म्हणजे दररोज हे ठिपके एकाच रंगाचे असतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ठिपक्यांना नेमका अर्थ काय? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


का असतात हे ठिपके?


खरे तर वेगवेगळ्या रंगांचे हे चार ठिपके वर्तमानपत्राच्या छपाईबद्दल सांगतात, ज्याद्वारे वर्तमानपत्र छापले गेले आहे. ही एक विशेष प्रकारची छपाई आहे, ज्याला CMYK मुद्रण म्हणतात. या छपाईमध्ये चार रंग असतात.


वास्तविक, या विशिष्ट छपाईमध्ये निळसर (हलके आकाशी), गुलाबी, पिवळा आणि काळा रंग आहे. CMYK प्रिंटिंगमधील चार गोष्टींचे हे चार ठिपके प्रतिनिधित्व करतात, ज्यात निळसर, गुलाबी, पिवळा आणि काळा यांचा समावेश होतो.



होतं काय की मुळात या चार रंगांचा योग्य प्रमाणात वापर करून कोणताही रंग बनवता येतो. या सर्व रंगांच्या प्लेट्स एका पानावर स्वतंत्रपणे मांडल्या जातात आणि मुद्रित करताना त्याच ठिकाणी रांग येतो. कोणत्याही रंगीत छपाईसाठी हे चार रंग आवश्यक असतात.


लक्षात घ्या की, टोनर-आधारित किंवा मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रिंटिंगसाठी ही पद्धत खूप स्वस्त आहे. म्हणजेच या चार रंगांचा या  छपाईमध्ये वापर केला जातो. अशा परिस्थितीत वृत्तपत्राची छपाईही याच पद्धतीने केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून हे वृत्तपत्र कसे छापले गेले हे सांगितले जाते.