मुंबई : लहान असो वा कोणी वृद्ध सगळ्यांनाच बिस्किटं खायला आवडतात. बिस्किटांच्या अनेक चव असतात, त्यामुळे त्याला वेगळ्या प्रकारे खाल्ले जाते. जसे की, काही बिस्किटं चहा किंवा दुधासोबत खाल्ले जातात. तर काही बिस्किटं नुसतंच खाल्लं जातं. जसं बिस्किटाची चव वेगळी आहे, त्याला खाण्याची पद्धत वेगळी आहे, तसेच त्याला बनवण्याची पद्धत देखील वेगळीच आहे. तसेच त्याचा आकार देखील वेगवेगळा असतो. तुम्ही छिद्र असलेले बिस्किट देखील खाल्ले असेल, परंतु तुम्ही कधी विचार केलाय की, बिस्किटांना छिद्र किंवा छोटे होल का असतात? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत.


वाफे पास होण्यासाठी छिद्र केले जातात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिस्किटं बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान, मैदा, साखर आणि मीठ प्रथम शीटमध्ये गुंडाळले जाते. यानंतर या शिट मशिनमध्ये ठेवल्या जातात, या मशिनमध्ये त्याला छोटे छिद्र पाडले जातात. या लहान छिद्रांना डॉकर्स म्हणतात.


बिस्किटे बनवताना या छिद्रांशिवाय बिस्किटे बेक करताना अडचणी येतात. या छिद्रांमध्ये बेकिंग दरम्यान हवा असते, ज्यामुळे बिस्किटांवर बबल तयार होण्यास प्रतिबंध होतो.


बिस्किटावरील छिद्र इतके महत्त्वाचे का आहे?


बेकिंग प्रक्रियेदरम्यान, ओव्हनमध्ये गरम केल्यानंतर पीठात हवेचे फुगे पसरू लागतात, तेव्हा ही छिद्रे बिस्किटाची वाफ बाहेर पडण्यास मदत करतात. जेणेकरून बिस्किट जास्त फुगत नाही.


उष्णता बाहेर पडू देण्यासाठी आणि तापमान स्थिर ठेवण्यासाठी छिद्र केले जातात
बिस्किटावरील छिद्र असेच बनवले जात नाही, तर त्याला एक खास स्केल देखील आहे. या प्रक्रियेत, छिद्राची स्थिती योग्य ठिकाणी तसेच समान अंतरावर असणे फार महत्वाचे आहे. यामुळे बिस्किटे जास्त कडक किंवा मऊ होणार नाहीत.


तसेच बिस्किटमध्ये छिद्रांची योग्य संख्या देखील असावी. ज्यामुळे ही बिस्किटं चांगली कुरकुरीत होतात. सहसा ही छिद्रे बिस्किटातून हिट बाहेर येण्यासाठी केली जातात. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने छिद्रे केली नाहीत, तर बिस्किटांचे तापमान स्थिर राहणार नाही आणि त्यामुळे क्रॅक तयार होऊन बिस्किटे फुटू शकतात.