मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. भारताली अनेक राज्यांमध्ये परिस्थिती अतिशय वाईट आहे, जिथे बलात्काराचे हजारो गुन्हे नोंदवले जातात. तर काही लोकांनी भीतीपोटी गुन्हा नोंदवला देखील नाही. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला भरतातील अशा राज्यांबद्दल आणि शहरांबद्दल सांगत आहोत, जिथे महिलांवर बलात्काराच्या घटना सर्वात जास्त घडल्याची नोंद झाली आहे. एवढेच काय तर या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण या राज्यांबद्दल आज जाणून घेऊया आणि तुम्ही हे देखील जाणून घ्या की, या लिस्टमध्ये तुमच्या राज्याचे किंवा शहराचे नाव तर नाही ना?


सर्वाधिक बलात्कार प्रकरणाच्या या यादीत राजस्थान अव्वल स्थानावर आहे, जिथे 5 हजार 310 बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. यानंतर, उत्तर प्रदेश हे महिलांवर सर्वात जास्त अत्त्याचार होण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात 2 हजार 769 आणि मध्य प्रदेशात 2 हजार 339 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


त्यानंतर तर बंगालमध्ये 872 आणि आसाममध्ये 485 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.


जर महानगरांबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीमध्ये बलात्काराचे 976 आणि जयपूरमध्ये 409 गुन्हे दाखल आहेत. यानंतर मुंबईचा क्रमांक आहे, जिथे 322 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


महिलांविरोधातील गुन्हांबद्द्ल बोलायचे झाले तर, त्तर प्रदेश हे अव्वल स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात महिलांवर 49 हजाप 385 आणि राजस्थानमध्ये 34 हजार 535 गुन्हे दाखल आहेत. National Crime Records Bureau 2020च्या रिपोर्टनुसार हे आकडे घेण्यात आले आहे.