CISF jawan opened fire : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात शनिवारी एका सीआयएसएफ जवानाने आपल्या दोन साथीदारांवर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडण्यासाठी जवानाने आपल्याजवळ असलेल्या एके-47 रायफलचा वापर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेत एका सहकारी जवानाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एके-47 हे अत्याधुनिक शस्त्र आहे. 


सहकाऱ्यांवर गोळी झाडल्यानंतर सीआयएसएफ जवान आतमध्ये होता. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे अनेक लोक जमा झाले. त्यानंतर जखमी जवानाला रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


त्याचवेळी पोलिसांनी आरोपी सीआयएसएफ जवानाला अटक केली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.



डिसेंबर 2019 मध्येही असाच काहीसा प्रकार भारतीय संग्रहालयात झाला होता. दरम्यान, सीआयएसएफ जवानाने आपल्या सहकारी जवानावर गोळीबार का केला हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलिसांनी आरोपी जवानाला पकडून आपल्यासोबत नेले आहे.