Kolkata Rape and Murder: पहिल्यांदाच कॅमेऱ्यावर बोलला आरोपी संजय रॉय, म्हणाला, `मला खरं तर...`
Kolkata Rape and Murder: कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात झालेल्या तरुणी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीने कोर्टात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आपला जबाब नोंदवला आहे. यावेळी त्याने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचं सांगितलं. तसंच आपण हा गुन्हा केला नसून, अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे.
Kolkata Rape and Murder: कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात झालेल्या तरुणी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीने कोर्टात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आपला जबाब नोंदवला आहे. यावेळी त्याने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचं सांगितलं. तसंच आपण हा गुन्हा केला नसून, अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे.
मुख्य आरोपी संजय रॉयने कोर्टात सांगितलं की, "मी बलात्कार आणि हत्या केलेली नाही. मी निर्दोष आहे. मला अडकवण्यात आलं आहे. सरकारने मला अडकवलं आहे. त्यांनी मला शांत राहण्याची धमकी दिली आहे. कोलकाता पोलिसांनी मला धमकावलं आहे". 11 नोव्हेंबरपासून कोर्टात याप्रकरणी रोज सुनावणी होणार आहे.
सीबीआयने याप्रकरणी चार्जशीट दाखल केली असून, संजय रॉय दोषी असल्याचं सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाला सामूहिक बलात्कार नाही तर बलात्कार म्हटलं आहे. या चार्जशीटनुसार, संजय रॉयनेच हा गुन्हा केला आहे. पीडितेकडून घेतलेल्या सीमनचा नमुना चाचणीत जुळला आहे.
सीबीआयने दावा केला आहे की सीएफएसएल अहवालाने हे वीर्य संजय रॉयचे असल्याची पुष्टी केली आहे. अनेक भौतिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि फॉरेन्सिक रिपोर्ट्सच्या आधारे त्यानेच गुन्हा केल्याचे सिद्ध होत आहे. या घटनेच्या 24 तासांत कोलकाता पोलिसांनी त्याला अटक केली होती.
चार्जशीटमध्ये 9 ऑगस्ट रोजी घटनास्थळावरून सापडलेले छोटे केस फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं. रिपोर्टमध्ये हे केस संजय रॉयचे असल्याचं म्हटलं आहे. अशाप्रकारे पाहिले तर कोलकाता पोलिसांनी अडीच महिन्यांपूर्वी जे सांगितले होते, तेच सीबीआयनेही सांगितले आहे.
100 साक्षीदार, 12 पॉलीग्राफ टेस्ट, सीसीटीव्ही कॅमेरे, फॉरेन्सिक रिपोर्ट, कॉल डिटेल्स आणि मोबाईलचे लोकेशन, इअरफोन्स आणि आरोपींचे जबाब यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये सीबीआयने हेही स्पष्ट केले आहे की, प्रशिक्षणार्थी सामूहिक बलात्कार झाला नसून बलात्कार झाला आहे.
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ डॉक्टरची हत्या संजय रॉय या एकाच व्यक्तीने केली होती. यामागे अन्य कोणाचाही हात नाही. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार हे प्रकरण सोडवण्यासाठी तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. यातील पहिलं म्हणजे सेमिनार रुमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडीओ आहे.
सीसीटीव्हीत संजय रॉय 9 ऑगस्टला पहाटे 4 वाजता सेमिनार हॉलमध्ये जाताना दिसत आहेत. अर्ध्या तासानंतर तो बाहेर पडतो. या काळात संजय व्यतिरिक्त कोणीही सेमिनार हॉलमध्ये गेले किंवा बाहेर आले नाही. दुसरं म्हणजे सेमिनार हॉलमध्ये संजय रॉयच्या मोबाईलचे इअरफोन सापडले. जे नंतर त्याच्या ब्लूटूथला जोडले गेले. तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट. नखांमध्ये सापडलेल्या रक्ताशी संजयचा डीएनए जुळला. याशिवाय सीमनचा डीएनएही संजयशी जुळला. प्रायव्हेट पार्टमध्येह संजचा डीएनए नमुना सापडला.
आरोपपत्रानुसार, संजय रॉयने घटनेच्या रात्री खूप मद्यप्राशन केलं होतं. त्याच नशेच्या अवस्थेत तो रात्री चार वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. प्रशिक्षणार्थी ज्युनिअर डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपल्याचं त्याला माहिती नव्हतं. यानंतर तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. तो तिचे तोंड आणि गळा दाबू लागतो. आरोपपत्रानुसार, संजय रॉयने प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार केला तेव्हा ती बेशुद्ध होती. पीडितेच्या शरीरावर 16 बाह्य आणि 9 अंतर्गत जखमा होत्या.
स्वत:ला वाचवत असताना तिने संजयवरही हल्ला केला. त्यामुळे बोचकरताना तिच्या नखांमध्ये त्याचं रक्त आलं होतं. संजयच्या हातावर आणि मानेवरही ओरखड्याच्या खुणा होत्या. याचे योग्य उत्तर तो देऊ शकला नाही. सध्या न्यायालयात आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.