Kolkata Rape Murder Case Lady Leading CB: कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये 9 ऑगस्टच्या रात्री 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याने देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये या प्रकरणावरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राजीनामा द्यावा म्हणून विद्यार्थ्यांबरोबरच विरोधकांकडून आंदोलनं केली जात आहेत. असं असतानाच या प्रकरणाचा तपास दुर्घटना घडल्याच्या पाचव्या दिवशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या टीमचं नेतृत्व एक महिला अधिकारी करत आहे. ही महिला अधिकारी आहे तरी कोण जाणून घेऊयात...


57 वर्षीय महिला अधिकारी करतेय लीड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडे कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर 9 ऑगस्टच्या रात्री झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला असून नवीन खुलासे समोर येत आहेत.सीबीआयच्या टीमचं नेतृत्व महिला अधिकाऱ्याकडे असून ती चंढीगडची आहे. या महिला अधिकाऱ्याने यापूर्वी अनेक गुंतागुंतीची प्रकरणं यापूर्वी सोडवलेली आहे. देशभरामध्ये चर्चेत असलेल्या कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास ज्या सीबीआयच्या टीमकडे सोपवण्यात आला आहे त्याचं नेतृत्व 57 वर्षीय महिला अधिकारी सीमा पहुजा करत आहेत


अनेक प्रकरणांमध्ये तपास अधिकारी राहिल्यात


सीमा पहुजा या सध्या कोलकात्यामध्ये असून तपासाचं नेतृत्व करत आहेत. सीमा पहुजा या अतिरिक्त पोलीस निरीक्षक आहेत. 2017 च्या कोठखाई बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये सीमा यांचा समावेश होता. तसेच 2020 साली झालेल्या हाथरसमधील सामुहिक बलात्कार प्रकरण आणि 2017 च्या उन्नौ बलात्कार प्रकरणाच्या तपासामध्येही सीमा सहभागी होत्या.


शिक्षण आणि बढती


सीमा यांनी बीकॉमची डिग्री घेतली असून त्या 1998 पासून सीबीआयच्या सेवेत आहेत. त्या 1993 साली उपनिरिक्षक झाल्या. त्यानंतर त्यांना उप निरिक्षकपदी बढती देण्यात आली ती 2013 साली. नुकत्याच म्हणजेच 2022 मध्ये त्या अतिरिक्त पोलीस निरीक्षक झाल्या. 2021 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.


या महिला अधिकाऱ्याचं वैशिष्ट्य काय?


प्रत्यक्षदर्शींचं सायकोअॅनालिसिस करण्यामध्ये सीमा याचा हातखंड आहे. "कोणतीही गोष्ट नजरेआड जाऊ नये म्हणून त्या त्यांच्याकडील प्रकरणांचा वारंवार अभ्यास करतात. प्रकरण कोर्टात मांडताना आपल्या दाव्याला समर्थन करणाऱ्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात आणि प्रकरणाचा तर्कसंगत निकाल लागावा यासाठी सीमा प्रयत्नशील असतात," असं त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.