Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर प्रकरणात एक धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमधून 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडला त्या ठिकाणचा हा फोटो आहे. या सेमिनार हॉलमध्ये कामगार, डॉक्टरांसह नागरिकांची गर्दी दिसत आहे. या फोटोवरुन कोलकाता डॉक्टर प्रकरणात क्राइम सीनसोबत छेडछाड झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढ्या लोकांना घटनास्थळी पोहोचू दिलं कसं, असा प्रश्न उपस्थित होतोय. याशिवाय घटनास्थळाशी छेडछाड केल्याचा आरोपही केला करण्यात येत आहे. (Kolkata Doctor Rape Murder Case Update crime scene photo viral rg kar college )


सीबीआयने पुराव्याचे नुकसान केल्याचा आरोप...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सीबीआयने असा आरोप केला की, क्राइम सीन म्हणजे सेमिनार हॉलमधील हत्येची जागा त्यावेळी जे घडलं असेल तशी ती नाही. त्याठिकाणचे पुरावे खराब करण्यात आलेय. मात्र कोलकाता पोलिसांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. शिवाय असेही सांगण्यात आलं की, फोटोमध्ये दिसणारे सर्व लोक त्या वेळी तेथे असण्यासाठी पूर्णपणे अधिकृत होते आणि त्यांची ओळख पटली आहे.



व्हायरल झालेल्या फोटोवर कोलकाता पोलीस काय म्हणालेत...


डीसीपी सेंट्रल इंदिरा मुखर्जी यांनी सांगितलंय की, 'फोटोमध्ये दिसत आहे की परिसराला अनेकांनी वेढा घातल्याच पाहिला मिळत आहे. या गराड्याच्या मागे एक मृतदेह आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या सर्व लोकांची नावं मी तुम्हाला सांगू शकतो. ते सर्व तपास पथकाचे सदस्य होते. तेथे कोणीही अनधिकृत व्यक्ती गेला नाही. फोटोमध्ये उपस्थित लोकांची नावं देताना मुखर्जी म्हणाले की, आमच्याकडे गुप्तहेर विभागाचे व्हिडीओग्राफर, पोलीस आयुक्त, अतिरिक्त सीपी-1, महिला पोलीस आणि फॉरेन्सिक अधिकारी आहेत.'


ते म्हणाले की, 'आणखी एक फोटो आहे जे बरेच लोक पाहात आहात. आमच्याकडे साक्षीदार डॉक्टर, FSL, फिंगरप्रिंट तज्ञ, गुप्तहेर विभागाचे ACP, व्हिडीओग्राफर, अतिरिक्त CP-1 आणि फॉरेन्सिक अधिकारी आहेत. हा फोटो किंवा व्हिडीओ तपास पूर्ण झाला त्यावेळचा आहे.'


प्रशिक्षणार्थी डॉक्टरशी संबंधित हत्येचे पुरावे नष्ट केले?


तपासादरम्यान कोणताही पुरावा सापडला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना या घटनेची माहिती सगळ्या अगोदर 9 ऑगस्टला सकाळी 10.10 वाजता मिळाली. सकाळी 10.12 वाजता रुग्णालय चौकीतील पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर सकाळी 10.30 वाजता पोलिसांनी दुसरा घेराव घातला. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा विकृत मृतदेह सापडल्याची घटना 9 ऑगस्टच्या रात्री घडली.



भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया साइट X वर 9 ऑगस्टचा एक कथित व्हिडीओ शेअर केला आणि सांगितलं की, क्राइम सीन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. ज्यामध्ये बरंच डॉक्टर, पोलीस, रुग्णालयातील कर्मचारी आणि बाहेरील लोक उपस्थित होते.