Kolkata Doctor Rape Murder Post Mortem Report : कोलकातामधील (Kolkata News) आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील (hospital Kolkatal) पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि मृत्यूनंतर अख्खा देश हादरलाय. या घटनेनंतर देशभरातील डॉक्टर मृत पीडित (Lady Doctor Murder) डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेय. अशातच त्या पीडितवर किती भयानक आणि राक्षसी कृत्य झाल्याच पोस्टमार्टम रिपोर्टमधून (Post Mortem Report) समोर आलंय. (Kolkata Doctor Rape Murder Case Update victim 14 injury marks Post Mortem Report ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम रिपोर्टनुसार मृताच्या शरीरावर 14 हून अधिक जखमांच्या खुणा होत्या आणि तिच्या शरीराला कोणतेही फ्रॅक्चर आढळले नाहीत. त्यासोबत प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार झाल्याच पोस्टमार्टन रिपोर्टमधून समोर आलंय. डोके, दोन्ही गाल, ओठ, नाक, उजवा जबडा, हनुवटी, मान, डावा हात, खांदा, गुडघा, घोटा आणि खाजगी भागावर जखमा आढळल्या आहेत. पोस्टमार्टन रिपोर्टनुसार बाह्य आणि अंतर्गत जननेंद्रियाचे वजन हे 151 ग्रॅम होतं. शरीराच्या अनेक भागांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांसह फुफ्फुसात रक्तस्त्राव झाल्याचे या अहवालात लिहिलंय. 


हेसुद्धा वाचा - Kolkata Doctor Murder : 'घटना सामान्य वाटावी म्हणून बलात्कार; हॉस्पिटलमध्ये S*x - ड्रग्ज रॅकेट', धक्कादायक खुलासा


पीएम रिपोर्टमध्ये असं म्हणण्यात आलं की पीडितेच्या शरीरावर आणि खाजगी भागावरील सर्व जखमा तिच्या मृत्यूपूर्वी आहेत. रिपोर्टच्या आधारे पीडित तरुणीला दोन्ही हातांनी गळा दाबून तिची हत्या करण्यात आलीय, असं  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जबरदस्तीने प्रवेश केल्यास रिपोर्टमध्ये नमूद केलंय. पीएम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरचा लैंगिक छळ झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. 


SC ने कोलकाता घटनेची स्वतःहून घेतली दखल 


कोलकाता घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल असून 20 ऑगस्टला सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी, पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणाराय. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीच्या यादीत हे प्रकरण 66 व्या क्रमांकावर असले तरी खंडपीठ प्राधान्याने त्यावर सुनावणी करणार आहे. देशव्यापी संताप आणि डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात या विषयावर याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूरतेची स्वत:हून दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती.