कोलकाताच्या आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा म्हणून सतत निदर्शने देखील करण्यात आली. या दरम्यान पीडितेच्या वडिलांनी कोलकाता पोलिसांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित वडिलांच्या म्हणण्यानुसार, कोलकाता पोलिसांनी खूप घाई गडबडीत अंतसंस्कार करण्यास दबाव निर्माण केला. त्यांनी असा आरोप केला की, कोलकाताचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला लाच देण्याचा देखील प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


कोलकाता पोलीस अगदी सुरुवातीपासून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच नव्हे तर पीडित वडिलांचा आरोप आहे की, मुलीचा मृतदेह देखील आम्हाला पाहू दिला नाही. अनेक तास आम्हाला पोलिसांनी वाट पाहायला लावली. पोस्टमार्टमनंतर मृतदेह सोपवला. या दरम्यानच एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न केला पण आम्ही ते नाकारले. 


पीडितेच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, आपल्या मुलीला न्याय मिळाव्या या दृष्टीकोनातून आम्ही डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. 10 ऑगस्ट रोजी संपूर्ण बंगालमध्ये आंदोलन करण्यात आली. वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी पीडितेला न्याय मिळावा म्हणून या आंदोलनात सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करत आहे. 


काय आहे प्रकरण? 


9 ऑगस्टला कोलकातामधील आरजी कर मेडिकलक कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेचा आरोपी संजय रॉय या दुष्कर्मानंतर त्याच ब्लिडींगमध्ये झोपला. पोलिसांनी नंतर त्याला ताब्यात घेतलं गेलं. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. 


संदीप घोष यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका


कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाने 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशाला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने बलात्कार-हत्या प्रकरण आणि रुग्णालयातील आर्थिक अनियमिततेचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 3 सप्टेंबर रोजीच अलीपूर न्यायाधीश न्यायालयाने संदीप आणि इतर 3 जणांना 8 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. या सर्वांवर आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे.