Kolkata Father Killing: पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली.(Crime News)  एका व्यक्तीची पत्नी आणि मुलाने मिळून हत्या केली आहे. (Kolkata Crime News) ते एवढ्यावर न थांबता करवतीच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेह लपवण्यासाठी त्याने वडिलांच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा मर्डर केसपासून (Shraddha Murder Case) प्रेरित होऊन आई आणि मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले.


मुलाला आईची साथ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने बाथरुमच्या आत करवतीने वडिलांचा मृतदेह कापला. ज्यामध्ये आईनेही त्याला साथ दिली. आई आणि मुलगा आधी मृतदेहाचे तुकडे सायकलवर एकत्र फेकण्यासाठी गेले. मात्र, त्यानंतर दोन वेळा मुलगा एकटाच मृतदेहाचे केलेले तुकडे सायकलवर टाकून फेकून देण्यासाठी गेला होता. (अधिक वाचा - श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर पोलिसांकडून श्रद्धाच्या मोबाईलचा शोध)


आई आणि मुलाने मिळून केली हत्या 


ही हृदयद्रावक घटना कोलकात्यातील बरुईपूर भागात घडली आहे. आई आणि मुलगा या दोघांनी उज्ज्वल चक्रवर्ती या व्यक्तीची हत्या केली आणि नंतर दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने प्रेरित होऊन त्यांचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. खरे तर खुनाच्या तीन-चार तासांनंतरही आई - मुलाला काय करावे हे समजत नसताना दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणासारखेच काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि मुलाने वडिलांचे सहा तुकडे केले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


कोलकाता येथे श्रद्धा हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती


दिल्लीतील छतरपूर येथील श्रद्धा हत्याकांड तब्बल पाच महिन्यांनंतर उघडकीस आले आहे. 18 मे 2022 रोजी, लिव्ह-इन पार्टनर आफताबने कथितरित्या श्रद्धाचे 35 तुकडे केले. आफताबने मृतदेहाचे तुकडे सुमारे तीन आठवडे घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते, असा करण्यात येत आरोप आहे. यासाठी त्याने नवीन फ्रीज विकत घेतला. मात्र, नंतर त्याने मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. त्याचा शोध सुरुच आहे. आता कोलकाता येथेही अशीच एक घटना घडली होती.


श्रध्दा हत्याकांडाची कसून चौकशी


विशेष म्हणजे श्रद्धा हत्याकांडाचा तपास पाच राज्यांत सुरु आहे. पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातून पुरावे गोळा करुन सर्व माहिती मिळवली. घटनेचे सत्य बाहेर आणण्यासाठी सोमवारी आरोपी आफताबची नार्को टेस्टही केली जाऊ शकते. न्यायालयाने यापूर्वीच नार्को चाचणीला परवानगी दिली आहे. श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत