कोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणात ट्विस्ट... पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी म्हणाला `मी मृतदेह पाहिला आणि...`
Kolkata rg kar Hospita : कोलकातातल्या आरजी कर हॉस्पीटलमध्ये महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोप संजय रॉयने आपण अत्याचार आणि हत्या केली नसल्याचं सांगितलं आहे.
Kolkata rg kar Hospita : आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील (Kolkata Rape and Murder Case) प्रमुख आरोप संजय रॉय (Sanjay Roy) याची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली. यात आरोपी संजयने धक्कादायक वक्तव्य केलं. आपल्याला याप्रकरणात फसवण्यात आलं आहे. मी महिला डॉक्टरची हत्या केली नाही, मृतदेह पाहून मी पळालो, असं संजय रॉयने म्हटलं आहे.
घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी संजय रॉयला अटक केली. यानंतर 25 ऑगस्टला संजयची पॉलिग्राफ टेस्ट (Polygraph Test) करण्यात आली. यावेळी त्याला सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरची हत्या केल्यानतंर तू काय केलंस? हत्या केल्यानंतर तू कुठे गेला होतास? यावर आरोपी संजय रॉयने सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह पाहिल्यानंतर आपण तिथून पळून गेलो असं उत्तर दिलं, पॉलिग्राप टेस्टमध्ये संजय रॉयने बलात्कार आणि हत्येच्या आरोपाचा इन्कार केला आहे. बलात्कार आण हत्येत आपला कोणताही सहभागी नव्हता असंही संजय रॉयने म्हटलं आहे.
संजय रॉयने त्याच्या वकिल कविता सरकार यांच्यासमोरही आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. कविता सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय रॉय अपराधी नाही. त्याला फसवलं जात आहे.
आरजी कर रुग्णालयात पुन्हा हंगामा
महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्येमुळे चर्चेत आलेलं कोलकाताचं के आरजी कर हॉस्पीटल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अपघातात जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच हंगामा केला. तरुणाच्या मृत्यूला रुग्णालयाचा बेजाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. हुगळी जिल्ह्यातल्या कोन्नगर इथला 28 वर्षांचा तरुण बिक्रम भट्टाचार्य याला शुक्रवारी दुपारी ट्रकने चिरडलं. यात बिक्रम गंभीररित्या जखमी झाला. त्याला तात्काळ आरजी कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान बिक्रमचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना हंगामा केला.
मृत विक्रमची आई कबिता यांनी बिक्रमला उपचारासाठी इमरजन्सी वॉर्डात दाखल केलं त्यावेळी तिथे एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या उपचाराला उशीर झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. त्याला तात्काळ उपचार मिळाले असते तर आपला मुलगा जिवंत असता असं मृत बिक्रमच्या नातेवाईकांचा म्हणणं आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 12.40 वाजता बिक्रम भट्टाचार्यला आरजी कर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण यावेळी इमरजेन्सी वॉर्डमध्ये एकही डॉक्टर नव्हता.
पण आरजी कर अधिकाऱ्यांनी मात्र कुटुंबियांचा आरोप फेटाळून लावला आहे. बिक्रमला हॉस्पीटलमध्ये आणल्यानंतर त्याला तात्काळ ट्रॉमा केअरमध्ये नेण्यात आलं. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. त्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला सीटी स्कॅनसाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्याआधीच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि यातच त्याचा मृत्यू झाला असं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलं आहे.