Sealdah Court slams CBI :  कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणावर सध्या संपूर्ण देशाचं लक्ष आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. एकीकडे तपास सुरू असताना सीबीआयने चूक केली. त्यावरून सियालदह न्यायालयाने सीबीआयला फटकारलं आहे. सीबीआयने या प्रकरणात 10 पॉलीग्राफ चाचण्या आणि 100 लोकांची चौकशी केली. सीबीआयने तपास केला. मात्र, कोर्टासमोर सादर करताना सीबीआयने गंभीर चूक केली. त्यामुळेच आरोपीला आम्ही सोडून द्यायचं का? असा सवाल कोर्टाने सीबीआयला विचारला आहे.


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, आरोपी संजय रॉय यांच्या जामीनाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू होताच सीबीआयचे वकील आणि तपास अधिकारी तब्बल 40 मिनिटं उशिराने न्यायालयाच्या खोलीत पोहोचलं. त्यामुळे आरोपीला जामीन मिळावा, अशी मागणी केली गेली. 40 मिनिटांनंतर जेव्हा तपास अधिकारी आणि वकिल पोहोचले तेव्हा कोर्टाने दोघांनाही फटकालं अन् तुमचा दृष्टिकोन अजिबात योग्य नाही, असं स्पष्ट शब्दात सांगितलं. जर तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेऊ शकत नसाल आणि तुमची वृत्ती उदासीन राहिली तर आम्ही आरोपींना जामीन द्यावा का? असा सवाल देखील न्यायालयाने विचारला आहे.


या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याने पॉलीग्राफ चाचणीदरम्यान या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचं म्हटलं आहे आणि मृतदेह पाहून तो पळून गेल्याचा दावा केलाय, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. ज्यावेळी संजय रॉयला अटक झाली होती, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. मात्र, आता त्याने यु-टर्न घेतलाय. आपण निर्दोष असल्याचं आरोपी संजयने म्हटलंय. मात्र, सीबीआयने आरोपीविरुद्ध सर्व पुरावे सादर केले आहेत. मृताच्या शरीरातून पुरावा म्हणून गोळा केलेले नमुने संजय रॉय यांच्या डीएनएशी जुळले होते, त्यामुळे संजय हाच गुन्हेगार असल्याचं सीबीआयचं मत आहे. 


दरम्यान, कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे सदस्यत्व निलंबित केले आहे. आरजी कर मेडिकल कॉलेजच्या (RG Kar Medical College) एका डॉक्टरने मोठा दावा केला आहे. मृत महिला डॉक्टरबरोबर आधी मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा दावा या डॉक्टरने केला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळणार की काय? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.