बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत जनता दल (सेक्युलर)चे नेते एचडी कुमारस्वामी किंगमेकर बनतील अशी चर्चा होती पण निकालानंतर तेच कर्नाटकचे किंग बनले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडून येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत नसल्याने त्य़ांनी पदाचा राजीनामा दिला. आता राज्यात काँग्रेस आणि जेडीएसची सरकार बनणार आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हे आता मुख्यमंत्री बनणार आहेत. याआधी सिद्दरमैया म्हणायचे की ते पुन्हा कधीच मुख्यमंत्री नाही बनू शकणार. पण आता सिद्दरमैया आणि कुमारस्वामी एकत्र आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुमारस्वामीचं मुख्यमंत्री बनणं जितकं रोचक होतं तितकच रोचक त्यांचं जीवन देखील आहे. कुमार स्वामी यांची दुसरी पत्नी राधिका आणि त्यांच्या वयात खूप मोठं अंतर आहे.



कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी राधिका आणि मुलगी.


16 डिसेंबर 1959 ला जन्म झालेले कुमारस्वामी यांनी 2 विवाह केले आहेत. पण त्यांचा दुसरा विवाह सर्वात जास्त चर्चेत होता. कुमारस्वामी यांनी पहिलं लग्न 1986 मध्ये अनिता कुमारस्वामी यांच्यासोबत केला. त्यांचा निखिल गौडा हा मोठा मुलगा आहे. कुमारस्वामींनी 2006 मध्ये कन्नड अभिनेत्री राधिका सोबत विवाह केला. याचा खुलासा काँग्रेस नेता राम्या यांनी केला होता. याबातमी नंतर अनेकांना आश्चर्य झालं होतं.


कुमारस्वामी आणि राधिका यांच्या वयात खूप मोठं अंतर आहे. कुमारस्वामी यांनी जेव्हा 1986 मध्ये पहिला विवाह केला तेव्हा राधिकाचा जन्म झाला आहे. 2006 मध्ये त्यांनी दुसरा विवाह केला. कुमारस्वामी यांची पहिली पत्नी देखील त्यांच्याच सोबत राहते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोघे एकत्र देखील दिसले होते.