कुमारस्वामी यांच्या शपथविधी आधी पाऊस
जेडीएसचे कुमारस्वामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या निमित्ताने सर्व मोदी विरोधक एकवटल्याचं चित्र आहे.
बंगळुरू : जेडीएसचे कुमारस्वामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या निमित्ताने सर्व मोदी विरोधक एकवटल्याचं चित्र आहे, यासाठी बंगळुरात जय्यत तयारी करण्यात आली, पण शपथविधी आधीच रिमझिम पाऊस झाल्याने, शपथविधीसाठी आलेल्या पाहुण्यांची काहीशी पळापळ झाली, यानंतर काही वेळाने पाऊसला बंद झाला आणि शपथविधीच्या व्यासपीठावर मायावती आणि अखिेलेख यादव हे एकत्र गप्पा मारताना दिसले. कुमारस्वामी यांच्या जेडीएसपक्षाकडे सर्वाधिक कमी आमदार ३८ आमदार आहेत, तरीही काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. | ..असं असेल कर्नाटकाचं सत्तावाटपाचं सूत्र | यापूर्वी भाजपाच्या येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध न करता आल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यांच्याकडे एकूण १०४ आमदार होते. बहुमताचा आकडा काढण्यासाठी ११२ आमदार हवे होते. काँग्रेसकडे कर्नाटकात ७८ आमदार आहेत, तर जेडीएसकडे ३८, यांची एकूण संख्या ११६ होते, यावर काँग्रेसने हा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.