बंगळूरू : कर्नाटकात बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेसचे सरकार येणार आहे. या दोन्ही पक्षांमध्ये २०-१३चा फॉर्मुला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर रजनीकांंत म्हणाले ...


कसा असेल फॉर्म्युला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात जेडीएसचे २० आणि काँग्रेसचे १३ मंत्री असतील अशी माहिती मिळतेय. काँग्रेसचे जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. २३ मे रोजी एच.डी.कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर ते सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार होते. मात्र सोमवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी असल्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ बुधवारी म्हणजेच २३ तारखेला घेणार असल्याचे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे.  


 २४ तासांत बहुमत सिद्ध करु असंही कुमारस्वामींनी स्पष्ट केलं आहे. या शपथविधी सोहळ्याला सोनिया आणि राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडूंसह प्रमुख प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं  आहे.