लेडी सिंगम! तळपत्या उन्हात वृद्ध महिलेला 5 किमी खांद्यावर उचलून घरी पोहोचवलं
महिला पोलीस कर्मचाऱ्याने माणुसकीचे अनोखे उदाहरण मांडत वृद्ध महिलेची मदत करण्याचे ठरवले.
गांधीनगर : गुजरातमधील एका महिला पोलिसाने मानवतेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. या पोलिस महिलेनं वाळवंटातील कडाक्याच्या उन्हात एका वृद्ध महिलेला खांद्यावर 5 किमी अंतरावर घेऊन, तिला घरी नेण्याचे काम तिनं केले आहे. ही वृद्ध महिला गुजरातमधील कच्छमधील एका मंदिरात मोरारीबापूंची कथा ऐकण्यासाठी आली होती. परंतु यादरम्यान ही उन्हामुळे बेशुद्ध झाली होती. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने माणुसकीचे अनोखे उदाहरण मांडत वृद्ध महिलेची मदत करण्याचे ठरवले.
या महिला पोलिस कर्मचाऱ्याने या वृद्ध महिलेला खांद्यावर उचलून घेतले आणि तब्बल 5 किलोमीटर कडक उन्हात चालत महिलेला सुखरूप घरी पोहोचवले. महिला पोलिसांचे देशभरातून कौतुक होत आहे.
नक्की काय घडलं होतं?
ही 86 वर्षीय महिला रामाची कथा ऐकण्यासाठी डोंगरावर चढत होती. यादरम्यान तिला उष्णता सहन न झाल्याने बेशुद्ध पडली आणि ती जमिनीवर पडली. ही बाब महिला कॉन्स्टेबल वर्षाबेन परमार यांना समजताच त्यांनी तातडीने वृद्ध महिलेकडे मदतीसाठी धाव घेतली आणि महिलेला खांद्यावर उचलले.
यानंतर कडक उन्हात 5 किमी चालत महिलेला तिच्या घरी नेले.
गृहमंत्र्यांकडून कौतुक
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी महिला पोलिसाचे कौतुक करत 'खाकीची मानवता' असे ट्विट केले आहे.
महिला पोलिस कर्मचाऱ्याला मदत केल्यानंतर वृद्ध महिलेने त्याला मनापासून आशीर्वाद दिला.