पाटणा : लालूप्रसाद यादव यांनी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन नीतीश कुमार यांच्यावर आगपाखड केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही नीतीश कुमारांवर विश्वास ठेवला पण तो भस्मासूर निघाला, असं लालूंनी म्हटलंय. मी नीतीश कुमारांना चांगलंच ओळखतो... त्यामुळे त्यांच्याशी हातमिळवणी करणंही मला पटत नव्हतं... नीतीशला पाठिंबा द्यायचं मनात नसताना ते घरी आले आणि आमचा पाठिंबा मागितला... नीतीश कुमार अत्यंत संधीसाधू नेते आहेत, असं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलंय. 


देशात परिवर्तन बिहारमधून सुरू झालं... बिहारच्या जनतेला सारं काही कळतंय... गावागावांत राजद कार्यकर्ते नाराज आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. 


काय म्हटलं लालूंनी यावेळी... 


- मी मरेन पण भाजपसोबत जाणार नाही असं नीतीश कुमार यांनी ऑनरेकॉर्ड म्हटलं होतं, पण आज त्यांनी भाजपसोबतच हातमिळवणी केलीय


- सत्तालोलूप असतो तर नीतीश कुमार मुख्यमंत्री झालेच नसते... कारण आमच्या पक्षाकडे जास्त जागा होत्या, परंतु आम्ही असं केलं नाही


- मी नीतीशच्या कपाळावर टिळा लावला आणि म्हटल 'जाओ राज करो'... मी नीतीशला कधीही त्रास दिला नाही 


- मला दोषी ठरवण्यात नीतीश कुमारांचा हात... चारा घोटाळ्यात मला नीतीश कुमारांमुळेच शिक्षा मिळाली
 
- नीतीश सतत मोदींना भेटत राहिले. त्यांनी फार्म हाऊसवर भाजप अध्यक्षांचीही भेट घेतली, ही गोष्ट एका वर्तमानपत्रानं छापली तेव्हा ते खूप नाराज झाले होते.