`या` कारणाने लालू प्रसाद यांनी सोडला मांसाहार!
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहाच्या राजकरणातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लालू प्रसाद यादव.
पटना : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहाच्या राजकरणातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लालू प्रसाद यादव. त्यांना आहारात मासे खाणे फार आवडतात. मात्र गेल्या १५ दिवसांपासून लालूप्रसाद यांनी पूर्णपणे शाकाहारी झाले आहेत. त्यांनी मांसाहारला स्पर्श देखील केलेला नाही.
लालूंना कोणी दिला हा सल्ला ?
लालूंच्या जवळच्या नेत्याने असा दावा केला आहे की, लालू ज्योतिषीय परामर्शनंतर शाकाहारी झाले आहेत आणि त्यांनी मासाहाराचा त्याग केला आहे. ज्योतिषीय परामर्श आपल्या जीवनात उतरवण्यासाठी लालू प्रसाद यांनी मासाहार सोडला. राष्ट्रीय पक्ष दलाचे प्रवक्ता आणि ज्योतिषी शंकर चरण त्रिपाठी यांनी लालू यांना हा सल्ला दिला.
राष्ट्रीय पक्ष दलाच्या एका नेत्याने सांगितले की, तात्कालिक समस्या दूर होण्यासाठी त्रिपाठी यांनी लालूंना हा सल्ला दिला. त्याचबरोबर भगवान शिवसमोर घेतलेली शपथ तोडणे उचित नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी लगेचच मांसाहार वर्ज केला.
का सोडला मांसाहार ?
खरंतर काही वर्षांपुर्वी लालूप्रसाद यांनी मांसाहार सोडला होता. मात्र पुन्हा त्यांनी मांस-मच्छी खाण्यास सुरूवात केली. त्यानंतर भगवान शंकर लालूंच्या स्वप्नात आले व मांसाहार सोडण्यास सांगितले.
लालूंच्या जवळच्या लोकांनी सांगितले की लालू स्वतः मासे बनवून खात असतं.