Video Tej Pratap Yadav Grabs Youth Throat: राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहार सरकारमधील वनमंत्री तसेच पर्यटनमंत्री तेज प्रताप यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओ 22 ऑगस्टचा आहे. हा व्हिडीओ सेलार कला गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंत्री तेज प्रताप यादव संतापून एका तरुणाचा चक्क गळा पकडताना दिसत आहेत. त्यानंतर तेज प्रताप या तरुणाला धक्का देऊन दूर लोटतानाही दिसत आहेत.


कारण अस्पष्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, तेज प्रताप यादव यांनी ज्या तरुणाला धक्का दिला त्याचं नाव सुमंत यादव असं आहे. सुमंत हा पक्षाचा कार्यकर्ता आहे. सुमंत यादव गोपालगंज जिल्हा केसरी स्पर्धा जिंकणारे कुस्तीपटू बंका यादव यांचा मुलगा आहे. तेज प्रताप यादव यांनी अचानक सुमंत यादवचा गळा का पकडला, याचा खुलासा अद्यापही झालेला नाही. 


आजोळी घडला हा प्रकार


हा व्हायरल झालेला व्हिडीओ तेज प्रताप यादव आई-वडिलांबरोबर आजोळी आले होते तेव्हाचा आहे. लालू प्रसाद यादव हे बऱ्याच कालावधीनंतर सासरी आले आहेत. लालू यांच्याबरोबर त्यांची पत्नी तसेच राज्याच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि मुलगा तेज प्रताप यादवही होते. लालू आणि राबडी देवी यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मागून प्रसारमाध्यमांच्या आणि चाहत्यांच्या गर्दीमधून घरात जाताना तेज प्रताप यादव यांनी अचानक संतापून कार्यकर्त्याचा गळा पकडला.


त्या तरुणाने केवळ नमस्कार केलेला


सुमंत यादवने केवळ तेज प्रताप यादव यांना नमस्कार केला होता. मात्र सुमंतने नमस्कार करताच तेज प्रताप यादव संतापले आणि त्यांनी त्याचा गळा पकडला. त्यानंतर त्याला मागे धक्का दिला. तेथेच उभ्या असलेल्या कोणीतरी हा संपूर्ण घटनाक्रम मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला. या व्यक्तीला तेज प्रताप यादव यांनी धक्का दिल्यानंतर इतर लोक जरासे घाबरुनच मागे झाले. धक्का दिल्यानंतर पाठ फिरवून घराकडे चालत जातानाही तेज प्रताप यादवही संतापलेल्या चेहऱ्यानेच चालत गेले.



अनेकांना पटलं नाही वागणं


तेज प्रताप यादव यापूर्वीही त्यांच्या पत्नीमुळे, आगळ्या वेगळ्या कपड्यांमुळेही चर्चेत राहिले आहेत. लालू प्रसाद यादव हे सुद्धा त्यांच्या मजेशीर वक्तव्यांसाठी, लोकसभेतील भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांनी केलेल्या भाषणामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेही मोठमोठ्याने हसल्याचं पहायला मिळालं आहे. मात्र त्यांच्या मुलाचं हे असं वागणं अनेकांना पटलेलं नाही.