पटना : बिहारच्या राजकारणातील मोठे नेते लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव याचा विवाह ठरला आहे. विवाह ठरताच वडिलांच्या आशीर्वादासाठी शुक्रवारी तेजप्रताप दिल्लीला रवाना झाले. राज्याच्या माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यांचा विवाह माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या रायसोबत ठरला आहे. गुरुवारी ही गोष्ट सर्वांसमोर आली.


नितीश कुमार आणि मोदींना देणार आमंत्रण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवाहासाठी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना आमंत्रित करणार का ? या प्रश्नावर उत्तर देतांना त्यांनी म्हटलं की, विवाहामध्ये राजकारण नसतं. नीतीश कुमार, मोदीजी आणि सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल. 'सगळ्यांना माझा लग्नाची उत्सूकता होती. आता विवाह ठरला आहे. लग्नही नशिबाची गोष्ट असते. कोणाचा विवाह कोणाशी आणि कधी ठरेल हे कोणालाच माहित नसतं. आमच्या परिवाराची परंपरा आहे की, आई-वडीलच विवाह ठरवतात. त्यांची आवड हीच आमची आवड असते.'


तेजप्रताप यांचे वडील लालू यादव सध्या चारा घोटाळ्यात दोषी ठरल्याने तुरुंगात आहेत. रांचीमधील एका जेलमध्ये त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.



ऐश्वर्या रायसोबत विवाह


बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची मुलगी आणि परसा विधानसभा क्षेत्रातील राजदच्या आमदार चंद्रिका राय यांची ही मुलगी आहे. तेजप्रताप आणि ऐश्वर्याचा साखपपुडा पटनातील मौर्या हॉटेलमध्ये १२ मेला होणार आहे. राजदचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रिका राय यांनी देखील शुक्रवारी विवाहबद्दल माहिती दिली. ऐश्वर्या रायने आपलं शिक्षण पटनामधून केलं आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये पुढचं शिक्षण पूर्ण केलं.



सुशील मोदींकडे केली होती मुलगी शोधण्याची मागणी


तेजप्रताप यांनी एकदा बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्याकडे मुलगी शोधण्याची मागणी केली होती. सुशील मोदी यांनी मुलगी शोधण्यापूर्वी ३ अटी ठेवल्या होत्या. पहिली गोष्ट हुंडा घेऊ नये, अवयव दान करणे आणि कोणाच्या ही लग्नात बाधा आणू नये. अशा ३ अटी त्यांनी ठेवल्या होत्या.