नवी दिल्ली : अयोध्यामध्ये राम मंदिर बनविण्याविरोधात दिसणाऱ्या ऱाष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा पुत्र तेजप्रतापने धक्कादायक विधान केलयं.


अयोध्येत राम मंदिर बनवू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आम्ही अयोध्येत राम मंदिर बनवू असे त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सांगितले.


शुक्रवारी नालंदा जिल्ह्यातील मघडा गावात शीतलाष्टमी यात्रेत ते बोलत होते. जर बिहारमध्ये आरजेडीची सरकार आलं तर अयोध्येत राम मंदिर बनविण्यासाठी बिहार मधून एक एक वीट उत्तर प्रदेशला नेऊ असे त्यांनी सांगितले.


सर्व धर्मांना एकत्र घेऊन राम मंदिर बनविणार असल्याचेही तेजप्रताप म्हणाले.


आरएसएसवर निशाणा 


 याआधी शीतलाष्टमी यात्रेत दंगल स्पर्धेला तेजपाल यांनी सुरूवात केली. बिहारच्या माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यांनी शंखनाद आणि बासरी वाजवून भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांनी आरएसएस आणि भाजपावर निशाणा साधला.


राजकिय चर्चांना उधाण


निवडणुका झाल्यावर अनेकांना राम मंदिराच्या मुद्द्याचा विसर पडतो असे त्यांनी यावेळी सांगितले.


आरजेडी बिहारमध्ये सत्तेत आली तर अयोध्येत राम मंदिर बनवू असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राजकिय चर्चांना उधाण केलयं.