मुंबई : हिमाचल प्रदेशातील मनाली येथील 'तो' पॅराग्लायडिंगचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेलच. ज्यामध्ये एक व्यक्ती 'भाई 500 जास्त घे पण लँड करून दे' असं मोठ मोठ्याने ओरडत होता. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. 


हवेत महिलेची हालत खराब 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेचा हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील खजियार येथील असल्याचं सांगण्यात येतंय. सुरूवातीला महिलेने पॅराग्लायडिंग करण्यासाठी तयारी दर्शवली. मात्र जस जशी ती उंच वर जाऊ लागली तशी तिला भीती वाटू लागली. ती रडत रडत गाइडला आपल्याला खाली उतरव अशी मागणी करू लागली. भाई, मला लवकरच खाली उतरवं, आता खाली बघितलं जातं नाही, असं म्हणतं ओरडत आहे. 



हा व्हिडिओ एका युझरने फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने कॅप्शन लिहिलं आहे की, 'खजियारमधून आणखी एक पॅराग्लायडिंगचा व्हिडिओ समोर'


'ये आई, लवकर मला खाली उतरव' हा व्हि़डिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ती आपल्या आईला हाका मारत आहे. ही मुलगी प्रचंड घाबरली असल्यामुळे गाइड तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. तो तिला शांत होऊन मोठ्याने श्वास घे असं म्हणतं होती. मात्र ती घाबरली असल्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष देत आहेत. व्हिडिओत ही मुलगी सारखी रडताना दिसत आहे.



हा व्हिडिओ पुन्हा एकदा 'त्या' मुलाच्या व्हिडिओची आठवण होते. या व्हिडिओतही हा मुलगा गाइडला खाली उतरवण्याची मागणी करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे.