मुसळधार पावसाने भुस्खलनं, गाड्या गेल्या वाहून
या ढीगाऱ्यात रस्त्यावरील बोलेरो वाहून गेली.
उत्तराखंड : उत्तराखंडच्या उच्च हिमालयी आणि मनुस्यारी क्षेत्रात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याचे समोर येतंय. हे व्हिडिओ पाहता २०१३ मध्ये झालेल्या केदारनाथ नैसर्गिक आपत्तीच्या जखमा ताज्या झाल्या आहेत. मनुस्यारीतील सेराघाटच्या दानीबगड (मोतीघाट) येथे पाण्याची पातळी वाढल्याने हिमालयन हायड्रो पॉवर प्रकल्पाची १० मेगावॅट वीज परियोजनेचा बांध फूटला. या ढीगाऱ्यात रस्त्यावरील बोलेरो वाहून गेली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही. वीज उत्पादन ठप्प होण्यासोबतच डायवर्जन टॅंक उध्वस्त झाल्याचे हिमालयन हायड्रो पॉवर प्रोजेक्टचे मॅनेजर जगत सिंह भंडारी यांनी सांगितले.
अतिदक्षतेचा इशारा
राज्य हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पिथौरगढ, चंपावत, नैनीताल आणि ऊधमसिंह नगर जिल्ह्यात येत्या १२ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलायं. कैलाश मानसरोवरील यात्रेकरूंना अतिदक्षतेचा इशारा देत राज्यातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिलायं.