मुंबई : आपण सर्व भारतातच राहातो परंतु आपल्यापैकी फार कमी लोकांना भारताबद्दल माहित असेल? हा फोठा प्रश्न आहे. भौगोलिकदृष्ट्या भारत हा जगातील सातवा सर्वात मोठा देश आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर दुसरा सर्वात मोठा देश आहे. परंतु तुम्ही भारताचं शेवटचं टोक कसं दिसतं हे पाहिलं आहे का? तुम्हाला तर हे माहित असेल की, आपल्या देशात रस्ते आणि लोहमार्गाचे मोठे जाळे आहे. जे खूप लांब-लांब पर्यंत जातात. त्यामुळे तुम्ही कुठेही जा तुम्हाला तेथे रस्ता हा सापडेलच. परंतु भारताचा शेवटचा रस्ता कुठे आहे हे माहितीय का? तो तुम्हाला कुठे सापडेल आणि तो कसा दिसतो, हे तुम्हाला माहितीय का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर असे अनेक लोक आहेत, ज्यांना बऱ्याच अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यात रस आहे. त्यामुळे ज्या लोकांना भारताचा शेवटचा रस्ता पाहण्याची इच्छा असेल, त्या लोकांसाठी हा व्हिडीओ खरंच एक पर्वणी आहे.


वास्तविक, देशाचा शेवटचा रस्ता तामिळनाडूमधील एका निर्जन गावात आहे, ज्याला धनुषकोडी म्हणून ओळखले जाते.



हे गाव भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकमेव स्थलीय सीमा आहे, जे पाल्क समुद्रधुनीतील वाळूच्या ढिगाऱ्यावर आहे. हे गाव भारताची शेवटची भूमी म्हणून ओळखले जाते आणि ते याच रस्त्यावर आहे, ज्याला भारताचा शेवटचा रस्ता म्हणतात.


या रस्त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर Colours of Bharat नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्याचे सौंदर्य पाहायला मिळत आहे. आकाशातून पाहिल्यास हा रस्ता महाकाय शिवलिंगासारखा भासतो. ट्विटरवर शेअर केलेला अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाख 46 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.