Petrol and Diesel Price on 11 May 2023 : सरकारी तेल कंपनी दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol and Diesel Price) जाहीर करतता. यानंतरच महानगरांपासून छोट्या शहरांपर्यंत इंधनाचे दर अपडेट करण्यात येते. देशाची राजधानी नवी दिल्लीसह चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये किरकोळ बदल दिसून आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कच्चा तेलाच्या किमतीत चढउतार सुरुच आहे. ब्रेंट क्रूड 1.86% च्या घसरणीसह प्रति बॅरल $76.00 वर व्यापार करत होता. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 2.13% खाली, प्रति बॅरल $72.14 वर व्यापार करत आहे. हे पाहता आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या आघाडीवर देशातील जनतेला अद्याप दिलासा मिळालेला नाही. देशातील अनेक भागात पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे आहेत तर कुठे 90-95 रुपयांच्या दरम्यान आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMCs) आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमती आणि परकीय चलन दरांनुसार दररोज किमती सुधारतात. 


तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर


आज (11 मे 2023) पेट्रोल आणि डिझेलची किंमत (Petrol Diesel rate) निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईचा (Mumbai Petrol Rate) पेट्रोल दर 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. 


या पद्धतींद्वारे तुम्ही दर चेक करु शकता...


तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सहज शोधू शकता. यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल, तर तुम्ही 9224992249 वर RSP नंतर शहर कोड पाठवू शकता आणि तुम्ही BPCL ग्राहक असल्यास, RSP लिहून 9223112222 वर एसएमएस पाठवू शकता.