इंटरनेट शिवाय घरबसल्या माहिती करून घ्या तुमच्या खात्यातील शिल्लक
या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एसबीआई क्विक हे अॅप डाउनलोड करावे लागेल.
नवी दिल्ली : 'एसबीआई' बँकेने ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा अमलात आणली आहे. तुम्हाला तुमच्या खात्यात किती पैसे जमा आहेत आणि अन्य सेवांचा तुम्हाला इंटरनेट शिवाय लाभ घेता येणार आहे. घर बसल्या या सुविधेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला एसबीआई क्विक हे अॅप डाउनलोड करावे लागेल. फक्त एका मिड्स कॉलच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या तुमच्या खात्याची चौकशी करता येणार आहे.
यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड करावा लागणार आहे. मिस्ड कॉल किंवा एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे जमा आहेत याची माहिती मिळवू शकता. जर तुमच्या कडे एंड्रायड, विंडोज, आईओएस किंवा ब्लैकबेरी मोबाईल असेल तर तुम्हाला एसबीआई क्विक हे अॅप डाउनलोड करावे लागेल.
एसएमएसच्या माध्यमातून कशी मिळवाल बॅलेन्स आणि स्टेटमेंटची माहिती
- 6 क्रमांक 567676 प्रमाणे प्रीमियम शुल्क आकारले जाईल.
- 10 क्रमांक साठी तुमच्या मोबाईल बिलच्या प्लॅन नुसार शुल्क आकारले जाईल.
- मिस्ड कॉलच्या माध्यमातून बचत खात्याची माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
एसएमएसद्वारे मिस्ड कॉल किंवा पूर्व-परिभाषित कीवर्डद्वारे शिल्लक आणि मिनी स्टेटमेंटबद्दल माहिती मिळवू शकता. त्यासाठी आपल्याला एक-वेळ नोंदणी करणे आवश्यक आहे. मिस्ड कॉल किंवा एसएमएस आधारित सेवा सुरू करण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला ‘REG<space>Account Number’लिहूण 09223488888 रजिस्टर्ड मोबाईल नंबंर वरून एसएमएस करा. काही वेळानंतर तुम्हाला खात्रत जमा होईल. जर तुम्हाला खात्रीदायक एसएमएस प्राप्त झाला नाही तर एसएमएस फॉर्मेटसह नंबर तपासा. नोंदणी केल्यानंतर, आपण नेट बँकिंग किंवा एटीएमशिवाय एसबीआयची सेवा वापरू शकता
एसबीआय बॅलन्स चौकशीसाठी तुम्हाला 02222766666 वर नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एक मिस्ड कॉल पाठवा किंवा ‘BAL’ लिहुण 09223766666 वर एसएमएस करा. काही काळानंतर तुम्हाला माहिती मिळेल.
शेवटच्या 5 व्यवहारांची तपशील मिळवण्यासाठी 09223866666 मिस कॉल करू शकता. मिस्ड कॉलनंतर तुम्हाला शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्ही ‘MSTMT’ लिहूण 09223866666 वर एसएमएस पाठवू शकता, यामुळे गेल्या 5 व्यवहारांबद्दल माहिती मिळेल.