मुंबई :  कोरोना महामारीने संपूर्ण जगाचे आरोग्यच नाही तर अर्थशास्त्र देखील बिघडले आहे. महामारीमुळे ही बाब स्पष्ट झाली आहे की,  कोणत्याही मोठ्या आपत्तीसाठी आपण पूर्णतः आर्थिकदृष्ट्या तयार नव्हतो. या कठिण प्रसंगी अनेकांचे आर्थिक बजेट कोलमलडले आहे. तर अनेकांची जमापूंजी संपत आली आहे. कोरोनाने आपल्याला वित्ताचे व्यवस्थापन काटेकोर असावे असा धडा या सगळ्यांतून दिला आहे. तुम्ही सुद्धा पुढील गोष्टींचा वापर करून आर्थिक नियोजन करा. 


 बचत करा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोरोना महामारीमुळे बचतीचे महत्व अधोरेखित झाले आहे. जेवढीपण कमाई असेल त्याचा काही हिस्सा  बचत करत राहवं. विशेषतः कमी वयापासूनच बचतीची सवय लागायला हवी. भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आर्थिक आपत्तीत तुम्हाला कोणासमोर हात पसरण्याची गरज पडायला नको.


 गुंतवणूकीची सवय ठेवा.


 अनेक लोक बचतीला गुंतवणूक समजतात. परंतु असे नाही. गुंतवणूकीत आपण पैसे दुप्पट-तिप्पट होताना पाहू शकतो. बचतीसह गुंतवणूक करीत राहणं गरजेचं आहे.


 कर्ज कमी ठेवा


 कोरोनाच्या महामारीत तुमच्यावर कर्ज नसेल किंवा अगदी कमी असेल तर निश्चितच तुमच्यावर दबाव कमी असेल.  अशात ते लोक आर्थिक दबावात असतील ज्यांच्यावर कर्जाचा भार असेल. अनेकांच्या आय़ुष्याचा मोठा भाग क्रेडिट कल्चरमध्ये खर्च होत आहे.  त्यामुळे उधार आणि कर्ज कमी ठेवणे गरजेचे आहे.


 आरोग्याकडे लक्ष ठेवा


 व्यायामाला तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. वजन नियंत्रणात ठेवा.  लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होममुळे अनेकांचे वजन वाढले आहे. त्यानंतर आरोग्याच्याही समस्या उद्भवत असतात. त्यामुळे जीवनशैली आरोग्यमय ठेवा.


 विमा खरेदी करा


 महामारीतील सर्वात महत्वाची शिकवण म्हणजेच विमा होय.  आपल्या आर्थिक नियोजनात टर्म इंशुरन्स आणि हेल्थ इंशुरन्स असायलाच हवा. कठीण परिस्थितीत कुटूंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी टर्म प्लॅन गरजेचा आहे.  तुमचे वय आणि कमाई वाढण्यासह इंशुरन्स सुधारित करीत रहा


 कर वाचवण्यासाठी बचत


 एका नोकरदाराने नेहमी हा प्रयत्न करावी की, करापासून बचतीचे सर्व पर्याय वापरावे. कलम 80 सी, 80 डी सह जेवढे कर बचतीचे पर्याय असतील.  त्यांचा वापर करा.


 निवृत्तीचे नियोजन करा.


निवृत्तीबाबत आपले नियोजन बहुतांश वेळा दुर्लक्षित होते. मी नुकताच जॉब सुरू केला आहे. निवृत्ती बाबत आता का विचार करू हा अप्रोच चुकीचा आहे. त्यामुळे चांगल्या संस्थेची निवृत्ती योजना आपल्या आर्थिक नियोजनाचा भाग असणे गरजेचे आहे.


आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अद्यावत रहा


एक समजदार गुंतवणूकदार नेहमी आर्थिक नियोजन करत असताना नव्या गोष्टी शिकत असतो. स्वतःला अपडेट ठेवत असतो. त्यामुळे आपल्या कष्टाची पै अन् पै आपण कुठे गुंतवत आहोत. यासाठी नेहमी अपडेट रहा.