नवी दिल्ली: भारतामध्ये मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्यात यावं या प्रस्तावाला मंजुरी मिळताच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच मुस्लीम लीगने विरोध दर्शवला आहे. सोशल मीडियावरही या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अबु आझमी, झारखंडचे हफीजुल अंसारी यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असू नये असं अंसारी यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याची तरतूद आहे.


मोदी सरकारच्या या प्रस्तावावर मुस्लीम आमदारांनी विरोध दर्शवला आहे. झारखंडच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री हफीझुल अन्सारी म्हणाले की, मुलींच्या लग्नाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. खर्‍या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार हे सर्व करत असल्याचं अंसारी यांचं म्हणणं आहे. 


अबु आझमी यांनी मुलीचं 18 वय झाल्यानंतर लवकरात लवकर लग्न करून द्यायला हवं असा मुद्दा मांडला आहे. कुपोषण वाढत आहे. मुली वाचवा आणि शिकवा, भ्रष्टाचार यासारखे महत्त्वाचे विषय पुढे येऊ नयेत यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू असल्याचा आझमी यांनी म्हटलं आहे. मोदींच्या या प्रस्तावामुळे गुन्हेगारी वाढण्याचं प्रमाण असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.