नवी दिल्ली : सोशल मीडियावर शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. बिबट्या साळींदराची शिकार करताना एक व्हिडीओ समोर आला आहे. साळींदराला निसर्गाने संरक्षण कवच दिलं आहे. त्यामुळे त्याची शिकार करणं तेवढं सोपं नाही. ह्या चॅलेंजमध्ये बिबट्या फेल होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिबट्या हा साळींदराच्या मागे मागे दबक्या पावलाने त्याची शिकर करण्यासाठी जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र साळींदराचे काटे या बिबट्याला लागत आहेत. बिबट्या या साळींदराची शिकार करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे मात्र तो यामध्ये फेल होतो. 


छोट्याशा काटेरी जीवासमोर बिबट्याला हार मानावी लागते. बिबट्या साळींदरावर पंजा मारायला जाणार तोच त्याच्या पायात काटा घुसतो. बिबट्याला सुटत नाही. तो आपल्या पंजातील काटा काढण्यासाठी प्रयत्न करतो आणि साळींदर पुढे निघून जातं. साळींदराचा जीव वाचतो. 



बिचारा शिकार करायला पण शिकार न करता परत जाण्याची वेळ त्याच्यावर आली. एवढं नाही तर त्याच्या पायात काटाही घुसला. हा व्हिडीओ @MorissaSchwartz या युजरने शेअर केला आहे. मला पकडण्याची हिम्मत असेल तर पकडून दाखव असं कॅप्शन दिलं आहे. 40 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 1 लाख 22 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.