नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान (72) यांची पुन्हा वर्णी लागली आहे. पासवान यांनी आतापर्यंत सहा पंतप्रधानांसोबत काम केले आहे. पासवान यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1960 च्या दशकात झाली.हाजीपूर जागेवरून चार लाख मतांनी रेकॉर्डतोड विजय मिळवत ते बिहार विधानसभाचे सदस्य म्हणून आणिबाणीनंतर अधिक चर्चेत आले. 1989 मध्ये व्हीपी सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये पासवान सहभागी झाले आणि त्यांना श्रममंत्री बनवण्यात आले. एका दशकाच्या आत ते एच.डी.देवगौडा आणि आय.के.गुजरालच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री बनले.1990 च्या दशकात ज्या जनता दलाशी ते जोडले गेले होते त्यांनी भाजपा सरकार सोबत राष्ट्रीय आघाडी करत 'राजग'ला साथ दिली. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ते कोळसा मंत्री बनले. बाबू जगजीवन राम यांच्यानंतर बिहारमध्ये दलित नेते म्हणून ओळख बनवल्यानंतर पुढे जाऊन त्यांनी लोक जनशक्ति पार्टीची स्थापना केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


2002 च्या गुजरात दंगलीनंतर राजगतून बाहेर पडत त्यांनी कॉंग्रेसप्रणित संप्रगची वाट धरली. दोन वर्षांनी ते मनमोहनसिंग यांच्या सरकारनमध्ये रसायन आणि उर्वरकमंत्री म्हणून नियुक्त झाले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची पार्टी हारल्यानंतर मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आला. पासवान त्यावेळी आपला गड हाजीपूरमध्ये हरले होते. 


2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पासवान यांचे खुल्या मनाने स्वागत करत सात जागा लढण्यासाठी दिल्या. लोजपा सहा जागांवर जिंकली. पासवान, त्यांचा मुलगा चिराग आणि भाऊ रामचंद्र यांना विजय मिळाला. 



सामाजिक मुद्द्यांवरून टीका होत असताना देखील पासवान यांनी नरेंद्र मोदी सरकार सोबत राहिले. त्यांच्याकडे खाद्य, जनवितरणची जबाबदारी होती. जन वितरण विभागात सुधार आणण्यासोबतच त्यांनी चीनी संकटावर देखील प्रभावी काम केले. ते यावेळची लोकसभा लढले नव्हते. त्यांचे लहान भाऊ आणि बिहारचे मंत्री पशुपति कुमार पारस हे हाजीपूरमधून जिंकले होते.