नवी दिल्ली : सरकारी कंपनी लाइफ इंश्युरन्स कॉर्पोरेशनमध्ये (LIC) असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर (Assistant Administrative Officer)पदासाठी भरती आहे. या पदाच्या ७०० जागा रिक्त आहेत. जर तुम्हाला जागेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही किमान पदवीधर असणं गरजेचं आहे.  ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत किंवा ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी असणं क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात येतंय. अधिक माहितीसाठी  एलआयसी वेबसाईटवर (www.licindia.in)जाऊन अर्ज करू शकता.


वयोमर्यादा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असावे


शुल्क 


जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ६०० तर  SC/ST/PWD उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल.


मुदत 


२५ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत ही अर्ज प्रक्रीया सुरू राहणार आहे.