LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा
Top-10 Firms Market Cap: गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या इंडेक्स सेन्सेक्समध्ये घसरण झाली. यामध्ये 490 अंकांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान एलआयसीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 हजार 146 कोटींची कमाई दिली.
शेअर बाजारात नेहमी चढ-उतार होत असतो. बाजारात गुंतवणूक करताना कोणीही छातीठोकपणे नेमकी काय स्थिती असेल हे सांगू शकत नाही. पण, अनेक शेअर्स गुंतवणूकदरांचं नशीब बदलतात. अशीच काहीशी कमाल देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्सनी केली आहे. एलआयसीच्या गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
4 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणारे मालामाल
गेल्या आठवड्यात 30 शेअर्सचा मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) 490.14 अंकांनी किंवा 0.67 टक्क्यांनी घसरला. या कालावधीत, सेन्सेक्समधील टॉप-10 मूल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आणि या कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात एकत्रितपणे 2.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. दुसरीकडे, अशा सहा कंपन्या होत्या ज्यात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांच्या सामूहिक संपत्तीत 1,06,631.39 कोटी रुपयांची घट झाली आहे.
एलआयसीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ
आपल्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पडताना रिटर्न्स देण्यात एलआयसी सर्वात पुढे राहिली. केवळ 5 दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये, LIC मार्केट कॅपने 7 लाख रुपयांच्या पातळीला स्पर्श केला, परंतु नंतर तो थोडा कमी झाला आणि शेवटी संपूर्ण आठवड्यात तो 6,83,637.38 कोटी रुपयांपर्यंत वाढला. या कालावधीत कंपनीचे शेअर्स (LIC Stock) 14 टक्क्यांनी वाढले आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 86,146.47 कोटी रुपयांची वाढ झाली.
कमाईत 'या' कंपन्याही पुढे
एकीकडे एलआयसीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं, तर दुसरीकडे कमाईच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयपेही पुढे राहिली. SBI MCap पाच दिवसात 65,908 कोटींच्या वाढीसह 6,46,365 कोटींवर पोहोचला. गेल्या आठवड्यात कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर टाटा ग्रुपची टीसीएस आहे. यात गुंतवणूक करणाऱ्यांनी 61 हजार 435 कोटी कमावले. कंपनीचे बाजार भांडवल 15,12,743 कोटी रुपयांवर पोहोचलं.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही चौथी कमाई करणारी कंपनी होती. त्याचे बाजार मूल्य (Reliance MCap) 5,108 कोटी रुपयांनी वाढून 19,77,136 कोटी रुपयांवर पोहोचले.
HDFC Bank ची वाईट स्थिती
दरम्यान एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदरांना मोठा तोटा सहन करावा लागला. बँकेचे बाजार भांडवल (HDFC Bank M) 2,963.94 कोटींनी कमी झालं आणि 10,65,808.71 कोटींवर पोहोचलं. याशिवाय, ITC MCap 30,698.62 कोटी रुपयांनी कमी होऊन ते 5,18,632.02 कोटी रुपये राहिले. भारती एअरटेलचे मार्केट कॅप देखील 16,132.15 रुपयांनी घसरले आणि ते 6,31,044.50 कोटी रुपयांवर आले.
एचडीएफसी बँकेसह Infosys MCap, आयसीसीआय आणि हिंदुस्तान यूनिलिव्हरच्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला आहे.