मुंबई : LIC IPO Listing: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन शेअर बाजारात उतरली आहे. देशातील सर्वात मोठा IPO BSE आणि NSE वर 8 ते 9 टक्के घसरणीसह लिस्ट झाला. यापूर्वीही मार्केट एक्सपर्ट्सने देखील एलआयसीच्या शेअर्सची घसरणीसह सुरूवात होऊ शकते असे शक्यता व्यक्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमा कंपनीच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची निराशा केली. LIC चा स्टॉक बीएसई वर 81.80 रुपये (8.62% ) च्या घसरणीसह Rs 867.20 वर सूचीबद्ध झाला. त्याच वेळी, हा शेअर NSE वर 77 रुपयांच्या घसरणीसह 872 रुपयांवर सूचीबद्ध झाला.


20,557 कोटी रुपयांच्या या IPO साठी सरकारला देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या शेअरसाठी सरकारने 949 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला होता. एलआयसी पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना अनुक्रमे रु. 889 आणि रु. 904 प्रति शेअर वाटप करण्यात आले.