मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LICने आता RuPay प्रीपेड गिफ्ट कार्ड 'शगुन' लाँन्च केले आहे. सध्या हे पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आले आहे. यामागील कंपनीचे उद्दीष्ट डिजिटल आणि कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणे आहे. LIC ने  IDBIबँकेसोबत RuPayकार्ड शगुन सुरू केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा कार्ड गिफ्ट देण्याच्या Cashless पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बाजारात आणले जात आहे.


या गिफ्ट कार्डच्या माध्यमातून 500 ते 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम देता येते. या माध्यमातून ग्राहक एकापेक्षा जास्त व्यवहार करू शकतात. त्याच बरोबर मोबाईल, टेलिफोन, वीज इत्यादी बिले भरण्यासाठी ऑनलाईन शॉपिंगसाठीही याचा सहज वापर करता येणार आहे.


कार्डची मर्यादा 10 हजार रुपये


शगुन गिफ्ट कार्डमध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार रक्कमेचा व्यवहार करु शकता. फक्त हा व्यवहार 500 ते 10 हजार रुपयांदरम्यान असावा. याची वैधता 3 वर्षे आहे. एलआयसी सीएसएल म्हणते की, रुपे कार्डच्या व्यापक स्वीकार्यतेचा फायदा घेत शगुन गिफ्ट कार्डचा वापर देशभरातील लाखो व्यापारी दुकानांवर त्याचप्रणाने Amazon, Flipcart यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर देखील करता येईल.


कार्ड कुठे कुठे वापरता येणार? जाणून घ्या


-एलआयसीचे रुपे कार्ड 500 ते 10 हजार रुपयांच्या प्रीपेड रकमेसह उपलब्ध असेल. या कार्डद्वारे तुम्ही 3 वर्षांत अनेक ट्रंझॅक्शन करु शकतात.


-हे एक कॉन्टॅक्टलेस कार्ड असल्याने कार्डधारकांना 5 हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी पिन टाकण्याची गरज भासणार नाही.


-RuPay कार्डला सर्वत्र स्वीकारले जाते. अशा परिस्थितीत शगुन गिफ्ट कार्ड देशातील सर्व व्यापारी दुकानांत आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर वापरता येईल.


-कार्डधारक पॉईंट ऑफ सेल टर्मिनल्सवर शगुन गिफ्ट कार्डची कॉन्टॅक्टलेस टॅप-अँड-गो सुविधा वापरू शकतात. हे कार्ड एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.
-या कार्डच्या माध्यमातून डिपार्टमेंटल स्टोअर्स, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट्स, ज्वेलरी स्टोअर्स, युटिलिटी बिले, एअर, रेल्वे, बस तिकिट बुकिंग इत्यादींसाठी वापरू शकता.


-शगुन कार्डला 'एम-पासबुक' मोबाइल अ‍ॅपसह सहज जोडले जाऊ शकते. याद्वारे ग्राहक व्यवहाराची संपूर्ण नोंद तपासू शकतात. तसेच कार्ड शिल्लक प्रवेश करण्यासाठी रिअल-टाइम एक्सेस इत्यादी  तपासू शकतो.


तुम्हाला हे कार्ड केव्हा आणि कसे मिळेल?


सुरुवातीला हे प्रीपेड कार्ड  LIC आणि त्याच्या सहाय्यक घटकांद्वारे अंतर्गत वापरासाठी उपलब्ध केली जात आहेत. याचा उपयोग अधिकृत कार्यक्रमांदरम्यान कर्मचार्‍यांना पुरस्कृत करण्यासाठी केला जाईल.


एलआयसीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर हे रुपे कार्ड सर्वसामान्यांनाही उपलब्ध होतील.


कंपनीचे म्हणणे आहे की, हे कार्ड एलआयसी आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांना आणि अधिकृत वापरासाठी हे उपलब्ध असेल. नंतर हे डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सामान्य वापरासाठी देखील वापरले जाईल. यासाठी एलआयसी ग्राहक अर्ज करू शकतील आणि त्यांना हे कार्ड दिले जाईल.