LIC मॅच्युरिटीआधी करायची आहे सरेंडर? जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
जर तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे आणि त्यापासून तुम्ही ना खूष आहात.
LIC Policy - LIC ही देशातील सर्वात मोठी आणि सरकारी इन्शुरन्स कंपनी आहे. भारतीय जीवन बीमा आणि LIC इन्शुरन्स अशा दोन योजना देणारी ही सगळ्यात जुनी बीमा कंपनी आहे. ही सरकारी बीमा योजना कंपनी असल्याने असंख्य ग्राहक डोळे झाकून ही पॉलिसी घेतात. आजकाल मार्केटमध्ये अनेक खाजगी बीमा कंपन्या आल्या आहेत. त्यामुळे LIC घेतल्यावर अनेक ग्राहकांना ही पॉलिसी बंद करण्याची इच्छा होते. कारण LIC मधून जो फायदा व्हायला पाहिजे तो ग्राहकांना दिसत नाही. अशा वेळी जर पॉलिसी वेळेच्या आत बंद केली तर त्याला पॉलिसी सरेंडर (Policy Surrender) करणं असं म्हणतात.
जर तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे आणि त्यापासून तुम्ही ना खूष आहात. तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्ही अगदी सहज तुमची LIC
पॉलिसी सरेंडर (Policy Surrender) करु शकाल. LIC पॉलिसी सरेंडर करण्यासाठी काही नियम आहेत. आज आम्ही तुम्हाला नियम आणि प्रोसेस सांगणार आहोत. (lic policy how to surrender lic policy online and rules if you are planning to surrender lic policy in marathi)
पॉलिसी सरेंडर (Policy Surrender) करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी
1. जर तुम्ही पॉलिसी सरेंडर करता तेव्हा त्या पॉलिसीची Premium Value कमी होते
2. साधारण 3 वर्षांनंतरच तु्म्ही पॉलिसी सरेंडर करु शकता.
3. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वीच पॉलिसी सरेंडर केली तर तु्म्हाला कुठलीही रक्कम मिळत नाही.
4. पॉलिसी सरेंडर केल्यावर तुम्हाला Accidental Benefit चे फायदे प्रीमियममध्ये मिळत नाही.
5. पॉलिसी सरेंडर केल्यावर पहिल्या वर्षी भरलेलं प्रीमियमदेखील तुम्हाला मिळत नाही.
6. तु्म्ही जेवढ्या लेट पॉलिसी सेंडर करणार तेवढा अधिक फायदा तुम्हाला मिळतो.
पॉलिसी सरेंडर करण्याची प्रक्रिया
1. सगळ्यात पहिले LIC पॉलिसी सरेंडर फॉर्म नंबर 5074 भरा
2. आपल्या पॉलिसी बॉन्डचा ओरिजिनल डॉक्यूमेंट यासोबत जोडा.
3. त्यानंतर आपल्या बँकेचे तपशील भरा.
4. तर तुम्ही सरेंडर फॉर्म नाही भरत अशावेळी तुम्ही LIC चा NEFT फॉर्म भरा
5. या फॉर्मसोबत आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card) आणि ड्राइव्हिंग लाइसेंस (Driving License)ची कॉफी जोडा.
6. याशिवाय या फॉर्मसोबत तुम्हाला एक एप्लीकेशन लेटर जोडायचे आहे. ज्यात तुम्हाला पॉलिसी सरेंडर करण्याचे कारण सांगायचे आहेत.
7. हे सगळे डॉक्यूमेंट तुमच्या LIC ब्रांचमध्ये जमा करायचे आहेत.
8. या प्रक्रियेनंतर तुमची LIC सरेंडर करण्यात येईल.